Gadchiroli Drawn death | युवा अभियंत्याचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू : दोन महिन्यांपूर्वीच मिळाली होती नोकरी!

होळीनिमित्त रंग खेळून आंघोळीसाठी मित्र-मित्र गेले होते नदीकडे, पाण्याचा अंदाज न आल्याने बूडून मृत्‍यू
Gadchiroli Drawn News
Gadchiroli Drawn News | युवा अभियंत्याचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू
Published on
Updated on

गडचिरोली : मित्रांसमवेत आंघोळ करण्यासाठी गेलेल्या युवा अभियंत्याचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी आरमोरी येथे घडली. शुभम नामदेव रामटेके (२५) रा. गायकवाड चौक, आरमोरी असे मृत युवकाचे नाव आहे.

रंगपंचमीचा दिवस असल्याने आज शुभम आणि मित्रांनी एकमेकांना रंग लावले. त्यानंतर सर्वजण वैनगंगा नदीवर आंघोळीला गेला. परंतु अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. पोलिसांनी नागरिकांच्या साह्याने शुभमचा मृतदेह बाहेर काढला.

Gadchiroli Drawn News
Drawned Death : पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने युवकाचा बुडून मृत्यू

हलाखीच्या परिस्थतीत वडिलांनी शिकवले

शुभमचे वडील नामदेव रामटेके यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. ते कबाडीचा व्यवसाय करतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी शुभमला अभियांत्रिकीचे शिक्षण दिले. दोन महिन्यांपूर्वीच त्याला एका कंपनीत नोकरी मिळाली होती. परंतु काळाने आज त्याच्यावर घाला घातला.

जळाऊ लाकडांअभावी गैरसोय

आरमोरीत वनविभागाच्या बिटमध्ये जळाऊ लाकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे कुणाचा मृत्यू झाल्यास नागरिकांना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथे जाऊन लाकडे आणावे लागतात. लाकडे उपलब्ध न झाल्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तीव्र आंदोलन करेल, असा इशारा पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.अमोल मारकवार यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news