Gadchiroli News
Gadchiroli News |अतिदुर्गम तुमरकोठी येथील नव्या पोलिस ठाण्याचे उद्घाटन

Gadchiroli News |अतिदुर्गम तुमरकोठी येथील नव्या पोलिस ठाण्याचे उद्घाटन

छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात ९ नव्या पोलिस ठाण्यांची निर्मिती
Published on

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील तुमरकोठी येथे गडचिरोली पोलिसांनी स्थापन केलेल्या नव्या पोलिस ठाण्याचे उद्घाटन अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) छेरिंग दोरजे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

याप्रसंगी नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, केंद्रीय राखीव दलाच्या १९१ बटालियनचे कमांडंट सत्यप्रकाश तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

 Gadchiroli News
Gadchiroli News | आयुष्यमान भारत गोल्डन कार्डच्या नोंदणीत गडचिरोली जिल्हा राज्यात द्वितीय

गडचिरोली पोलिस दलाच्या सी-६० पथकाचे १ हजार कमांडो, बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या २१ चमू, शेकडो नवनियुक्त पोलिस, ५०० पोलिस अधिकारी आणि खासगी कंत्राटदारांच्या मदतीने हे नवे पोलिस ठाणे उभारण्यात आले आहे. तुमरकोठीचे पोलिस ठाणे कोठी पोलिस ठाण्यापासून ७ किलोमीटर, तर छत्तीसगड सीमेपासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर आहे.

याप्रसंगी आयोजित जनजागरण मेळाव्यात महिला आणि पुरुषांना कपडे, शेती व दैनंदिन वापराचे साहित्य तसेच विद्यार्थ्यांना शालेय आणि क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. मागील दोन वर्षांत गडचिरोली पोलिसांनी छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात ९ नव्या पोलिस ठाण्यांची निर्मिती केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news