Gadchiroli Naxal Movement | २ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल्यास हैदराबाद येथून अटक

२०१८ पासून नक्षली मोहिंमात सहभाग : अनेक पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद
Gadchiroli Naxal Movement
२ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल्यास हैदराबाद येथून अटक Pudhari Photo
Published on
Updated on

गडचिरोली : एका निरपराध इसमाच्या खुनाच्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या छत्तीसगड राज्यातील शंकर उर्फ अरुण येर्रा मिच्चा(२५) नामक नक्षल्यास गडचिरोली पोलिसांनी तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथून नुकतीच अटक केली.

Gadchiroli Naxal Movement
Gadchiroli Naxal Arrested | जहाल नक्षल उपकमांडर 'अंकल' पल्लो यास अटक

शंकर मिच्चा हा छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील बांदेपारा येथील रहिवासी असून, तो २०१८ मध्ये छत्तीसगडमधील नॅशनल पार्क एरियामधील मद्देड दलममध्ये सहभागी झाला. त्यानंतर त्याची बदली अहेरी तालुक्यातील पेरमिली दलममध्ये करण्यात आली. नोव्हेंबर २०२३ मध्ये कापेवंचा येथील रामजी आत्राम या इसमाच्या हत्येत त्याचा सहभाग होता. या प्रकरणी शंकर मिच्चा याच्यावर अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाय २०२० मध्ये येडदर्मी, २०२१ मध्ये मडवेली, २०२३ मध्ये वेडमपल्ली व २०२४ मध्ये चितवेली अशा चार चकमकीतही त्याचा सहभाग होता. शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

Gadchiroli Naxal Movement
Gadchiroli Naxal Encounter | गडचिरोली: चकमकीत चार नक्षलवादी ठार; मृतांमध्ये १ पुरुष, ३ महिलांचा समावेश

दरम्यानच्या काळात गडचिरोली पोलिसांनी अनेक जहाल नक्षल्यांना कंठस्नान घातल्याने शंकर मिच्चा हा पेरमिली दलम सोडून आपल्या गावी परत गेला. तेथे काही महिने शेती केल्यानंतर तो हैदराबाद येथे राहत होता. याविषयी माहिती मिळताच सी-६० पथकाच्या जवानांनी त्यास अटक केली. न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश, सत्यसाई कार्तिक, गोकुळ राज जी, पोलिस उप अधीक्षक विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बोरसे, उपनिरीक्षक अक्षय लव्हाळे, पवन जगदाळे, हवालदार संतोष नरोटे, राहुल दुर्गे यांनी ही कारवाई केली. जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत गडचिरोली पोलिसांनी १०८ नक्षल्यांना अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news