

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : भामरागड तालुक्यातील दिरंगी आणि फुलणार गावांच्या जंगलात नक्षल्यांचे शिबिर पोलिसांनी उदध्वस्त केले. यावेळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाला. त्याला हेलिकॉप्टरने नागपूरला हलविण्यात आले आहे. (Gadchiroli Naxal News)
दिरंगी आणि फुलणार गावांच्या जंगलात नक्षल्यांनी छावणी उभारल्याची माहिती मिळाल्यानंतर अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम.रमेश आणि श्रेणिक लोढा यांच्या नेतृत्वात सी-६० पथकाच्या १८ आणि जलद प्रतिसाद पथकाच्या २ तुकड्या त्या भागात काल रवाना करण्यात आल्या होत्या. त्यांनी नक्षलविरोधी अभियान राबविण्यास सुरुवात केल्यानंतर आज नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. या चकमकीत एक जवान गोळी लागून जखमी झाल्याने त्याला नागपूरला हलविण्यात आले आहे. या अभियानादरम्यान पोलिसांनी नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त केला असून, नक्षल साहित्य ताब्यात घेतले आहे.