Gadchiroli Municipal News | गडचिरोलीत चार सभापतींची बिनविरोध निवड, महिला व बालकल्याणसाठी निवडणूक

चार सभापतींपैकी एक सभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) देण्यात आले.
Gadchiroli Municipal  Subject Committee Election
Gadchiroli Municipal Subject Committee ElectionPudhari
Published on
Updated on

Gadchiroli Municipal Subject Committee Election

गडचिरोली : येथील नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी आज (दि.२१) झालेल्या विशेष बैठकीत चार सभापतींची बिनविरोध निवड झाली, तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात आली. चार सभापतींपैकी एक सभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) देण्यात आले.

आज नगर परिषद सभागृहात उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी अरुण एम व मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांच्या उपस्थितीत विषय समित्यांचे सभापतींची निवड करण्यासाठी विशेष सभा पार पडली. या सभेत भाजपचे अनिल कुनघाडकर यांची बांधकाम सभापतिपदी, मुक्तेश्वर काटवे यांची आरोग्य व स्वच्छता सभापती, हर्षल गेडाम यांची शिक्षण सभापती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक लीलाधर भरडकर यांची पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर स्थायी समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष असतील, तर उपाध्यक्ष निखिल चरडे यांना वित्त व नियोजन समितीचे सभापतिपद देण्यात आले.

Gadchiroli Municipal  Subject Committee Election
Gadchiroli Accident | नातेवाईकाच्या अंत्यविधीहून येताना कार नदीत कोसळली: २ ठार, तिघे गंभीर जखमी

मात्र, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापतिपदासाठी निवडणूक झाली. भाजपकडून सभापतिपदासाठी सीमा कोसे(कन्नमवार) यांनी अर्ज भरला. त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या नगरसेविका मनिषा खेवले रिंगणात होत्या. उपसभापतिपदासाठी भाजपच्या शिल्पा गव्हारे यांनी अर्ज भरला. त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या मेघा वरगंटीवार उभ्या होत्या. मात्र, ४ विरुद्ध २ अशा मतांनी भाजपच्या सीमा कोसे सभापतिपदी निवडून आल्या, तर याच फरकाने शिल्पा गव्हारे उपसभापती झाल्या. निवडीनंतर आ.डॉ.मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ.देवराव होळी, नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले.

अर्चना निंबोड यांची नाराजी

भाजपच्या नगरसेविका अर्चना निंबोड यांना पाणीपुरवठा समितीचे सभापतिपद हवे होते. परंतु राष्ट्रवादीचा फॉर्म्युला मध्येच आल्याने हे पद त्यांच्याकडे गेले. त्यामुळे भाजपने त्यांना महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदाची ऑफर दिली होती. परंतु निंबोड यांना ते मान्य नसल्याने नाराज होऊन त्या महिला व बालकल्याण समितीच्या निवडीदरम्यान उपस्थित राहिल्या नाही. त्यांच्या अनुपस्थितीची संधी साधत काँग्रेसने डाव टाकून आपले उमेदवार उभे केले. त्यामुळे निवडणूक घ्यावी लागली. परंतु काँग्रेसला यश आले नाही.

Gadchiroli Municipal  Subject Committee Election
Gadchiroli Accident | भरधाव ट्रॅव्हल्सची बसला धडक; थोडक्यात बचावले प्रवासी

राष्ट्रवादीला सभापतिपद देण्यावरुन वादंग

निवडीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करुन त्यांना सभापतिपद देण्यावरुन भाजप व भाजयुमोचे बहुतांश पदाधिकारी नाराज होते. राष्ट्रवादीने भाजपच्या विरोधात निवडणूक लढल्याने भाजपला अनेक जागा गमवाव्या लागल्या. त्यामुळे त्यांना सभापतिपद देऊ नका, असे या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. परंतु आ.डॉ.मिलिंद नरोटे व अन्य काही पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करुन वरिष्ठांशी बोलणी केली. राज्य पातळीवर युती असल्याने नगर परिषदेतही करा, असा त्यांचा संदेश असल्याचे सांगितल्यानंतर विरोध करणारे कार्यकर्ते थंड झाले. मात्र, नाराज होऊन ते निघून गेले. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसला बांधकाम सभापतिपद मिळेल, असे सर्वांना वाटत होते. परंतु भाजप व भाजयुमोच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीला पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदावर समाधान मानावे लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news