Gadchiroli Naxal | नक्षल सप्ताहात मोठी कारवाई : जंगलात पुरून ठेवलेली १४ अग्निशस्त्रे, स्फोटक साहित्य जप्त

महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेलगतच्या कुमनार जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरला होता मोठा शस्त्रसाठा
Kumnar Forest Maoist Arms Seized
Kumnar Forest Maoist Arms Seized Pudhari
Published on
Updated on

Kumnar Forest Maoist Arms Seized

गडचिरोली : नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफने संयुक्त कारवाई करत महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेलगतच्या कुमनार जंगल परिसरातून माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य जप्त केले.

दरवर्षी नक्षलवादी २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह साजरा करतात. यादरम्यान ते मृत नक्षल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांची स्मारके उभारतात आणि कधीकधी हिंसक कारवायाही करतात. त्याअनुषंगाने पोलिसांनी ३१ जुलैपासून विशेष शोधमोहीम राबविली.

Kumnar Forest Maoist Arms Seized
Gadchiroli News | तुमरकोठीच्या नाल्यात तरुण मृतदेह आढळल्याने खळबळ

१ ऑगस्ट रोजी बीडीडीएस पथकाने तपासणी करत एक एसएलआर रायफल, एक ३०३ रायफल, सात १२ बोर रायफल, तीन सिंगल शॉट रायफल, दोन बीजीएल लॉन्चर्स, तीन एसएलआर मॅगझिन, एक आयईडी स्फोटक आणि दोन बॅटऱ्या असा मुद्देमाल हस्तगत केला.

असा एकूण १४ अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. या मोहिमेत विशेष अभियान पथक, बीडीडीएस आणि सीआरपीएफच्या जवानांचा सहभाग होता. सहभागी जवानांचे पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news