Gadchiroli News : कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचाही मृत्यू

Gadchiroli News : कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचाही मृत्यू
Published on
Updated on

गडचिरोली : कोरची या आदिवासीबहुल तालुकास्थळापासून १७ किलोमीटर अंतरावरील हुडुकदुमा गावातील एका गरोदर मातेचा तिच्या बाळासह मृत्यू झाला. रमुला महेश काटेंगे(२४) असे मृत महिलेचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

हुडुकदुमा येथील रमुला काटेंगे ही ९ महिन्यांची गरोदर होती. तिला रविवारी(ता.१२) रात्री प्रसूती कळा आल्या. लगेच आपण आशा वर्करला बोलावले. परंतु ती आली नाही किंवा तिने वरिष्ठांनाही कळविले नाही, असे रमुलाचे पती महेश काटेंगे यांचे म्हणणे आहे. कळा वाढत चालल्याने आज सकाळी १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने तिला कोरची येथील ग्रामीण रुग्णलयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ.उके व डॉ.इटनकर यांनी तपासणी करुन औषधोपचार केले. परंतु प्रसूतीदरम्यान माता आणि बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी महेश काटेंगे यांच्या तक्रारीवरुन कोरची पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

आरोग्य सेवा विस्कळीत

कोरची तालुक्यातील आरोग्याची समस्या पाचवीला पुजलेली आहे. माता मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आशा वर्कर आणि मानसेवी डॉक्टरही पुरेसे लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे आजारी नागरिकांना कोरची येथील ग्रामीण रुग्णालय गाठावे लागते. परंतु खडतर प्रवासामुळे अनेकांना यापूर्वीही जीव गमवावा लागला आहे.

ऑक्सीजनची कमतरता

१०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची व्यवस्था नसते. डॉक्टरही नसतो. केवळ चालक हा रुग्णास घेऊन जातो. त्यामुळे ऑक्सिजनअभावी रुग्णाचा जीव जातो, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

उच्च रक्तदाब व भरपूर पाण्यामुळे मृत्यू: डॉ.इटनकर

रमुला काटेंगे हिची प्रकृती अतिशय गंभीर होती. आम्ही तिला व बाळाला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु तिचा रक्तदाब २४० पर्यंत पोहचला होता. शिवाय फुफ्फुसामध्ये हवेऐवजी भरपूर पाणी साचले होते. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. बाळ आधीच दगावले होते, असे कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.आशिष इटनकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news