Gadchiroli News | सात बेकायदेशीर स्कूल व्हॅन जप्त, सव्वा लाखांचा दंड: आरटीओची कारवाई

विविध भागातून आलेल्‍या तक्रारींच्या आधारे कारवाई
Gadchiroli News
प्रातिनिधीक छायाचित्रFile Photo
Published on
Updated on

गडचिरोली: विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत गडचिरोली येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने बेकायदेशीरपणे कार्यरत सात स्कूल व्हॅनवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर १ लाख २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

गडचिरोली शहरातील विविध भागांमध्ये बेकायदेशीर स्कूल व्हॅन संदर्भात मिळालेल्या तक्रारींच्या आधारे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने तपासणी मोहीम राबवली. यामध्ये अनेक व्हॅनकडे आवश्यक परवाने आणि कागदपत्रे नसल्याचे आढळले. काही वाहनांमध्ये अनुमतीपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक केली जात होती, तर काही वाहनांमध्ये विद्यार्थ्यांचे दप्तर वाहनाच्या टपावर ठेवले जात असल्याचे निदर्शनास आले. शिवाय विमा व फिटनेस कागदपत्रांची मुदत संपल्याचेही आढळून आले.

Gadchiroli News
Gadchiroli RTO News | सावधान! अल्‍पवयीन मुलांना दुचाकी चालवण्यास देताय? आधी ही बातमी वाचा

दरम्यान, विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर वाहतूक व्यवस्थेला मुळापासून रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी सांगितले. सर्व शाळा व्यवस्थापन आणि व्हॅन चालकांना त्यांच्या कागदपत्रांची व वाहनांची नियमित तपासणी करून ती वैध ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, पालकांनी आपल्या मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची सुरक्षा व परवाने तपासून ते योग्य असल्याची खात्री करण्याचेही आवाहन त्यांनी केले. येत्या काही दिवसांत तपासणी आणि वाहतूक सुरक्षेसंदर्भात जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Gadchiroli News
Gadchiroli News |मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्‍या जिल्ह्यात दोराच्या साह्याने विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news