Gadchiroli News | आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसमवेत मैदानावरच झोपले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष

स्टील प्रकल्प आणि विमानतळासाठी सुरु असलेल्या सुपीक जमिनींच्या अधिग्रहणाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन
प्रशासनाविरोधा सुरु असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी घरी न जाता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्र काढली.
प्रशासनाविरोधा सुरु असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी घरी न जाता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्र काढली.
Published on
Updated on

गडचिरोली: प्रस्तावित स्टील प्रकल्प आणि विमानतळासाठी सुरु असलेल्या सुपीक जमिनींच्या अधिग्रहणाविरोधात हजारो शेतकऱ्यांनी गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन सुरु केल्यानंतर पहिल्याच रात्री काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजित कोवासे यांनी पटांगणावर शेतकऱ्यांसमवेत झोप घेतली.

चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात प्रस्तावित स्टील प्रकल्प आणि गडचिरोली तालुक्यातील हिरापूर-गुरवळा परिसरात होणाऱ्या विमानतळाविरोधात कालपासून हजारो आबालवृद्धांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन सुरु केले.

दिवसभर चाललेल्या या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.विश्वजित कोवासे हेदेखील सहभागी झाले होते. रात्री सर्व आंदोलनकर्त्यांनी पटांगणावर सतरंजी अंथरुन झोप घेतली. ॲड. कोवासे यांनीही घरी न जाता शेतकऱ्यांसमवेत झोपणे पसंत केले. तत्पूर्वी कोवासे यांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रशासन व सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करुन मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन, अशी ग्वाही कोवासे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news