Gadchiroli Tiger Attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठारFile Photo

गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

Gadchiroli Tiger Attack | शेतात पिकाला पाणी देताना वाघाने केला हल्‍ला
Published on

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील गणपूर येथे वाघाने हल्ला करुन एका शेतकऱ्यास ठार केले. ही घटना शनिवार १ मार्चच्या रात्री उघडकीस आली. संतोष भाऊजी राऊत(४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

शनिवारी संतोष राऊत हे आपल्या शेतावर मका पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. परंतु संध्याकाळपर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शेतावर जाऊन बघितले. शेतालगत संतोषचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या पायाचा लचका तुटल्याचे आढळून आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news