Gadchiroli Naxal Encounter | छत्तीसगडमधील चकमकीत जहाल नक्षली रुपी रेड्डी ठार

छत्तीसगडमधील काँकेर जिल्ह्यातील माचपल्लीच्या जंगलात सोमवारी (दि.१३) पहाटे तुंबळ चकमक
Rupi Reddy killed
Rupi Reddy killed Pudhari
Published on
Updated on

Maharashtra Chhattisgarh border Naxal Encounter

गडचिरोली: जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील छत्तीसगडमधील काँकेर जिल्ह्यातील माचपल्लीच्या जंगलात सोमवारी (दि.१३) पहाटे तेथील पोलिसांशी झालेल्या तुंबळ चकमकीत जहाल नक्षलवादी रंगाबोईना भाग्या उर्फ रुपी रेड्डी ठार झाली. तिच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस होते.

काँकेर जिल्ह्याच्या छोटेबेठिया पोलिस ठाण्यांतर्गत काही नक्षली सक्रिय असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथील पोलिसांनी त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबविण्यास सुरुवात केली होती. आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. पोलिसांचा दबाव पाहून काही नक्षली पसार झाले. त्यानंतर घटनास्थळावरुन पोलिसांनी एका महिला नक्षलीचा मृतदेह आणि स्वयंचचित रायफल ताब्यात घेतली. मृत नक्षली ही रंगाबोईना भाग्या उर्फ रुपी रेड्डी असल्याचे स्पष्ट झाले.

Rupi Reddy killed
Gadchiroli news | 20 दिवसांनंतर आढळला शेतकऱ्याचा सांगाडा, वाघाने ठार केल्याचा अंदाज

कोण होती रुपी रेड्डी?

मूळची तेलंगणा राज्याची रहिवासी असलेली रुपी रेड्डी ही २००४ पासून नक्षल चळवळीत सहभागी झाली. छत्तीसगडमधील माड डिव्हीजनची विभागीय समिती सदस्य होती. तसेच उत्तर बस्तर क्षेत्रातील परतापूर क्षेत्रिय समिती सदस्य(एसीएम) होती छत्तीसगडमध्ये कार्यरत तेलंगणा कॅडरची ती अखेरची नक्षलवादी होती. छत्तीसगड राज्यातील जहाल नक्षलवादी तथा स्पेशल झोनल कमिटी मेंबर सुगुलुरी चिन्नाना उर्फ विजय रेड्डी याची रुपी ही पत्नी होती.

१३ ऑगस्ट २०२५ रोजी छत्तीसगडच्या मोहल्ला-मानपूर-अंबागड चौकी जिल्ह्यात झालेल्या चकमकीत विजय रेड्डी ठार झाला. त्यानंतरही रुपी ही नक्षल दलममध्ये सक्रिय होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३१ मार्च २०२६ अखेर देशातील नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार केल्यानंतर छत्तीसगड, तेलंगणा व महाराष्ट्रातील अनेक लहान-मोठ्या नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र, रुपी रेड्डी आत्मसमर्पण करण्यास तयार नव्हती. शिवाय बस्तरमधील सहकारी कॅडरनाही ती आत्मसमर्पण करण्यापासून परावृत्त करीत होती. अखेर पोलिसांनी तिला कंठस्नान घातले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news