Gadchiroli Bandh | दिल्लीतील हल्ल्याचा निषेध: गडचिरोली बंदला संमिश्र प्रतिसाद

आंदोलनकर्त्यांची इंदिरा गांधी चौकात सरकारविरोधात घोषणाबाजी
CJP Delhi Student Protest
गडचिरोली बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. Pudhari
Published on
Updated on

CJP Delhi Student Protest

गडचिरोली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याच्या निषेधार्थ आज आयोजित गडचिरोली बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

शहरातील शाळा व महाविद्यालये बंद होती. दुपारी बाजारपेठ सुरु झाली. तत्पूर्वी आंदोलनकर्त्यांनी इंदिरा गांधी चौकात एकत्र येऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

CJP Delhi Student Protest
Gadchiroli News | तुमरकोठीच्या नाल्यात तरुण मृतदेह आढळल्याने खळबळ

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते नगरसेवक बाळू टेंभुर्णे, शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख पवन गेडाम, नंदू कुमरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या जयश्री वेळदा, तसेच भाकप, माकप, आम आदमी पक्ष, बहुजन समाज पक्ष तसेच अन्य पक्ष आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news