

Gadchiroli Local Body Elections
गडचिरोली : आरमोरी नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी आज (दि. १९) पार पडलेल्या विशेष सभेत बहुमत असलेल्या भाजपच्या पाचही सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली.
आरमोरी नगरपरिषदेच्या सभागृहात आज दुपारी १ वाजता उपविभागीय अधिकारी प्रसेनजीत प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी सतीश चौधरी यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडली. सभेला नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक उपस्थित होते. नगर परिषदेत २० पैकी १५ नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत. त्यामुळे सभापतिपदांसाठी सभापतींची निवड बिनविरोध करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले
Gadchiroliनगरपरिषदेचे उपाध्यक्ष विलास पारधी यांची पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या पदसिद्ध सभापतिपदी निवड करण्यात आली. शुभम निंबेकर हे बांधकाम समिती सभापती, राहुल तितिरमारे हे स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीचे सभापती झाले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी मीनाक्षी गेडाम, तर नियोजन व विकास समितीच्या सभापतिपदी निखिल बोंदरे यांची निवड करण्यात आली. याच सभेत स्थायी समितीही गठित करण्यात आली.
निवड प्रक्रिया आटोपल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते, सहकार महर्षी प्रकाश पोरेड्डीवार यांनी नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार केला. आरमोरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू, अशी ग्वाही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी दिली.