Gadchiroli News | गडचिरोलीत शेतीला ड्रोनची साथ; जिल्हा परिषदेचा पथदर्शी उपक्रम

नक्षलग्रस्त भागातील शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवून शेती अधिक सक्षम बनविण्याचा हेतू
Gadchiroli News | गडचिरोलीत शेतीला ड्रोनची साथ; जिल्हा परिषदेचा पथदर्शी उपक्रम
Gadchiroli News | गडचिरोलीत शेतीला ड्रोनची साथ; जिल्हा परिषदेचा पथदर्शी उपक्रम
Published on
Updated on

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने ‘कृषी ड्रोन’च्या माध्यमातून खते आणि कीडनाशकांच्या फवारणीचा पथदर्शी उपक्रम सुरू केला आहे. दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवून शेती अधिक कार्यक्षम व सुरक्षित करण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे.

या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान व तांत्रिक सहकार्य केले जाणार आहे. तसेच स्थानिक युवक व महिलांना ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुख्यत: भात पिकावरील तुडतुडा आणि अन्य रोग नियंत्रणासाठी ड्रोनचा प्रभावी वापर होणार आहे. जेथे शेतात जाणे कठीण आहे, अशा भागात फिरते ड्रोन केंद्र सेवा देणार आहे.

ड्रोनद्वारे कीडनाशक फवारणी केल्याने पाण्याची ९० टक्के तर औषधाची २५ टक्के बचत होणार आहे. शिवाय फवारणी अधिक अचूक व प्रभावी होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. मागील वर्षी दोन महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान देण्यात आले असून, त्यांना ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. यामुळे कृषी क्षेत्राला आधुनिकतेची जोड मिळत असल्याचे कृषी विकास अधिकारी किरण खोमने म्हणाले. कृषी ड्रोन उपक्रमामुळे जिल्ह्यात हायटेक शेतीला चालना मिळेल. शेती अधिक आधुनिक, सुरक्षित व कार्यक्षम बनण्यास मदत होईल तसेच महिला बचत गटांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सांगितले.

हे आहेत ड्रोन तंत्रज्ञानाचे फायदे

युवक आणि बचत गटांच्या महिलांना ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याने त्यांना रोजगाराची संधी निर्माण होईल. तसेच अलीकडे जाणवत असलेल्या मजुरांच्या टंचाईवर मात करता येईल. कमी खर्चात अधिक क्षेत्रा जलद गतीने कीडनाशकांची फवारणी करता येईल. विषारी औषधांच्या संपर्कामुळे आजार वा जीवित हानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण होईल तसेच उत्पादन वाढीसही मदत होईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news