Gadchiroli Civil Surgeon Suspended | गडचिरोलीच्या जिल्हा शल्यचिकित्सक निलंबित; अक्षम्य निष्काळजीपणामुळे कारवाईचा बडगा

विभागीय चौकशीचे आदेश; पुढील आदेशापर्यंत मुख्यालय सोडण्यास मनाई
suspended
suspendedPudhari News Network
Published on: 
Updated on: 

Dr Varsha Lahade Suspended

गडचिरोली : गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा शिवाजी लहाडे यांना पर्यवेक्षकीय जबाबदारीत अक्षम्य निष्काळजीपणा व दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने निलंबित केले आहे. यासंदर्भातील आदेश १६ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आला.

शासन आदेशानुसार, डॉ. लहाडे यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदींनुसार ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होऊन पुढील आदेश जारी होईपर्यंत निलंबन कायम राहणार आहे.

suspended
Gadchiroli Crime | वाघोली शिवारातील खुनाचा ४८ तासांत उलगडा; दोन विधीसंघर्षग्रस्त बालके ताब्यात

निलंबनाच्या कालावधीत डॉ. लहाडे यांचे मुख्यालय जिल्हा रुग्णालय, गोंदिया येथे निश्चित करण्यात आले असून, सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.

निलंबन काळात त्यांना खासगी नोकरी स्वीकारता येणार नाही तसेच स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करता येणार नाही. अशा प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय केल्याचे आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

suspended
Gadchiroli News | गोंडवाना विद्यापीठातील वादग्रस्त नियुक्ती: माओवादी भूपतीच्या समर्थनार्थ शेकापची उडी

तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ मधील तरतुदींनुसार त्यांना निर्वाहभत्ता व इतर पूरक भत्ते देण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news