Lok Sabha elections 2024 : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून अशोक नेते यांना महायुतीची उमेदवारी

Lok Sabha elections 2024 : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून अशोक नेते यांना महायुतीची उमेदवारी
Published on
Updated on
गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : Lok Sabha elections 2024 : भारतीय जनता पक्षाने आज महाराष्ट्रातील तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यात गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नेते यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्याशी होणार आहे.
अशोक नेते हे १९९९ ते २००९ अशी दहा वर्षे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार होते. त्यानंतर २०१४ पासून ते आजतागायत खासदार आहेत. आता पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.
गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघातून अशोक नेते यांच्यासह आ. डॉ. देवराव होळी, डॉ. मिलिंद नरोटे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे इच्छूक होते. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात जाईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र आज भाजपने अशोक नेते यांना महायुतीची उमेदवारी देऊन सर्व शक्यतांना पूर्णविराम दिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news