गडचिरोली: आष्टी येथे ट्रकच्या धडकेत मुलगी ठार

गडचिरोली: आष्टी येथे ट्रकच्या धडकेत मुलगी ठार
Published on
Updated on

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : सुरजागड पहाडावरुन लोह खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत १२ वर्षीय मुलगी ठार झाल्याची घटना आज (दि.१४) आष्टी येथे दुपारी ३ च्या सुमारास घडली. सोनाक्षी मसराम असे मृत मुलीचे नाव आहे.ती चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील नांदगाव फाटा येथील रहिवासी होती.

सोनाक्षी ही आज दुपारी आपल्या मामासोबत (एमएच ३४, एझेड ९५७५) मोटारसायकलने आष्टी येथून गोंडपिपरीकडे जात होती. मात्र, वनविभागाच्या तपासणी नाक्यासमोर मोटारसायकल स्लीप झाल्याने दोघेही खाली पडले. एवढ्यात मागून येणाऱ्या ट्रकने सोनाक्षीला जबर धडक दिली. यात ती जागीच ठार झाली. घटनेनंतर ट्रकचालक पसार झाला. या घटनेमुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. आष्टी पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. हा ट्रक सुरजागड येथून लोहखनिज घेऊन चंद्रपूर जिल्ह्याकडे जात होता, अशी माहिती आहे.

सुरजागड येथून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, यावर काहीही उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news