Chandrapur Gram Panchayat Election : ब्रम्हपुरीतील एकमेव किटाळी ग्रामपंचायतीत काँग्रेसचे दिपक कुमरे यांचा विजय

चंद्रपूर काँग्रेसचा दणदणीत विजय
चंद्रपूर काँग्रेसचा दणदणीत विजय

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : ब्रम्हपुरी तालुक्यातील किटाळी येथील गट ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विकास कामांवर विश्वास ठेवून काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे. यात सरपंचपदी काँग्रेसचे दिपक कुमरे हे विजयी झाले आहेत. सदस्यांमध्ये सौ. दर्शना कुमरे, सौ. राणी झोडे, दिनेश सुरपाम, सौ. सपना वरठे विजयी झाल्या आहेत. यापैकी प्रभाग २ चे काँग्रेस दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. दुसऱ्यांदा थेट जनतेतून सरपंचाची निवड करण्यात आली आहे. तालुक्यात फक्त एकाच ग्राम पंचायतीची निवडणूक होती.

किटाळी ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. शांताराम रामटेके यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न केल्याने काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष खेमराज तिडके, जिल्हा परिषद माजी सदस्य डॉ. राजेश कांबळे, पंचायत समिती माजी सदस्य थानेश्वर कायरकर, तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, जिल्हा परिषद माजी सदस्य प्रमोद चिमुरकर, पंचायत समिती माजी सभापती नेताजी मेश्राम, सुरेश पाटील ठिकरे उपसरपंच भुज, डॉ.शांताराम रामटेके, माधो पाटील कुभरे, भारत मडावी, निलेश सहारे, राकेश सुरपाम, अशोक बोरकर आणि किटाळी, नवेगाव, लोहार डोंगरी या ३ गावातील ग्रा. प. उमेदवार व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news