चंद्रपुरातील आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानासाठी सल्लागार नेमणार : सुधीर मुनगंटीवार

चंद्रपुरातील आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानासाठी सल्लागार नेमणार : सुधीर मुनगंटीवार
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या भविष्यातील विस्तारासाठी करण्यात आलेल्या पाण्याच्या नियोजनास मंजुरी तसेच चंद्रपूर येथे प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या निर्मीतीसाठी सल्लागार नेमण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (दि. १०) दिले.

महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 208 वी बैठक वन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली हिंगणा रोडवर स्थित महामंडळाच्या मुख्यालयात पार पडली. वन विभागाचे प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी (दूरदृष्य प्रणाली द्वारे), प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. वाय. एल. पी. राव, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, मुख्य महाव्यवस्थापक संजीव गौड, कंपनी सचिव सौरभ सिंह उपस्थित होते.

गोरेवाडा प्रकल्पांतर्गत भविष्यात सुरु करण्यात येणाऱ्या आफ्रिकन सफारी, नाईट सफारी, गोंडवाना संग्रहालय आदी प्रकल्पांच्या संचलनासाठी पाण्याच्या व्यवस्थेचे नियोजन नागपूर महानगरपालिकेमार्फत तसेच स्वत: महामंडळाने पाईपलाईनद्वारे करण्यास वनमत्र्यांनी मान्यता दिली. दरम्यान, गोरेवाडाच्या धर्तीवर चंद्रपूर येथे प्रस्तावित असलेल्या प्राणी उद्यानाच्या निर्मितीसाठी महामंडळाला सल्लागार नेमण्याकरिता निविदेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार सदर प्रस्तावास शासनाकडून मंजुरीसाठी पाठपुरावा करण्याचे निर्देशही देण्यात आले. रामजन्मभूमी पुन्हा जाणार सागवान सेंट्रल व्हिस्टा (नवीन संसदभवन), श्री राम जन्मभूमी निर्माणासाठी महामंडळाच्या वतीने मागणीनुसार चिराण सागवान पाठविण्यात आले. राम जन्मभूमी निर्माणासाठी प्राप्त अतिरिक्त मागणीसही मंजुरी देण्यात आली. महामंडळाकडे असलेल्या उर्वरित चिराण सागवानापासून फर्निचर व तत्सम वस्तु तयार करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news