Chandrapur Accident | मूल-चंद्रपूर मार्गावर ट्रकची कारला धडक: महिला पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

उजळणी प्रशिक्षणासाठी चंद्रपूरकडे जात असताना वलनी फाट्याजवळ काळाचा घाला
Mul Chandrapur Highway  Car Truck  Accident
विशाखा बन्सोडPudhari
Published on
Updated on

Mul Chandrapur Highway Car Truck Accident

चंद्रपूर : चंद्रपूर रोडवरील वलनी फाट्याजवळ सोमवारी (दि.१७) सकाळी साडेसहाच्या सुमारास ट्रक आणि स्विफ्ट कारची भीषण धडक होऊन महिला पोलीस कर्मचारी विशाखा बन्सोड यांचा जागीच मृत्यू झाला. उजळणी कोर्सच्या प्रशिक्षणासाठी स्वतःच्या कारने चंद्रपूरकडे जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या दुर्दैवी घटनेमुळे मूल शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस दलावरही शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाखा बन्सोड या सोमवारी सकाळी आपल्या स्विफ्ट कार क्रमांक 34 BR 2568 ने चंद्रपूर येथे आयोजित उजळणी कोर्सच्या प्रशिक्षणासाठी निघाल्या होत्या. दरम्यान, चंद्रपूर रोडवरील वलनी फाट्याजवळ त्यांच्या कारला समोरून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, कारचा मोठ्या प्रमाणात चेंदामेंदा झाला आणि या अपघातात विशाखा बन्सोड यांचा जागीच मृत्यू झाला.

Mul Chandrapur Highway  Car Truck  Accident
Chandrapur Accident : सेव्हन सिस्टर पेरजागडावरून परतणाऱ्या दुचाकीला अपघात; तरुण-तरुणी गंभीर

विशाखा यांची यापूर्वी सावली पोलीस ठाण्यात नियुक्ती होती. नुकतीच त्यांची तळोधी (बाळापूर) येथे बदली झाली होती. बदलीनंतर प्रशिक्षणाच्या निमित्ताने चंद्रपूरकडे जात असतानाच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीय, सहकारी पोलीस कर्मचारी तसेच परिचितांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

विशाखा या मूल शहरातील तेली मोहल्ला परिसरात रविकांत चिंतावार यांच्या घरी पतीसोबत भाड्याने राहत होत्या. त्यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. महिला पोलीस कर्मचाऱ्याचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने मूल परिसरात शोक व्यक्त होत आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघातग्रस्त वाहनांची पाहणी केली असून, पुढील तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news