

Chandrapur Theft Cases
चंद्रपूर : वरोरा पोलीस ठाणे हद्दीत ट्रकमधून बॅटरी व डिझेल चोरी करणाऱ्या युवकास वरोरा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीचा माल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शनिवारी (दि. १०) वरोरा पोलीस ठाण्यात दाखल अपराध क्रमांक ५/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अंतर्गत बॅटरी व डिझेल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी वरोरा पोलिसांनी गोपनीय माहिती संकलनासह तांत्रिक पद्धतीने तपास सुरू केला. या तपासात आरोपी नामे अरमान अहमद निसार शेख (वय २८) रा. राजुरा यास अटक करण्यात आली.
अटकेनंतर करण्यात आलेल्या चौकशीत आरोपीकडून ट्रकमधून काढून नेलेल्या २ नग बॅटऱ्या (अंदाजे किंमत १२,००० रुपये) तसेच गुन्ह्यात वापरलेले आयशर वाहन क्र. एमएच-४९-०१८३ (अंदाजे किंमत ५,००,००० रुपये) असा एकूण ५,१२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे, पोलीस अंमलदार दिलीप सुर, महेश गावतुरे, सौरभ कुलते, प्रशांत नागोसे, अमोल नवघरे, सुखराज यादव, विशाल राजुरकर, संदीप मुळे व मनोज ठाकरे (सर्व पोलीस ठाणे वरोरा) यांनी या कारवाईत सहभाग घेतला.