VBA Chandrapur | वंचित बहुजन आघाडीची चंद्रपूर शहर कार्यकारिणी बरखास्त

Vanchit Bahujan Aghadi |महापौर निवडणुकीवेळी नगरसेवक गैरहजर; संघटनात्मक कारवाईचा निर्णय
Vanchit Bahujan Aghadi
Vanchit Bahujan AghadiPudhari
Published on
Updated on

Chandrapur Municipal Corporation Politics

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील राजकीय घडामोडींना मोठा धक्का देणारा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला असून, चंद्रपूर शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्या अध्यक्षतेखालील संपूर्ण शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव किशन चव्हाण यांनी यासंदर्भातील अधिकृत पत्र जारी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव किशन चव्हाण यांनी पत्रकाद्वारे चंद्रपूर शहर कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. संघटनात्मक शिस्त आणि पक्षीय निर्णयांचे पालन न झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Vanchit Bahujan Aghadi
Chandrapur Mayor Election |चंद्रपूर महापालिकेवर भाजपचा झेंडा : संगीता खांडेकर महापौर, उबाठाचे प्रशांत दानव उपमहापौर

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक निवडून आले होते. मात्र आज झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या महत्त्वाच्या निवडणुकीच्या वेळी हे दोन्ही नगरसेवक गैरहजर राहिले. या घटनेमुळे पक्षाच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला असून, याच पार्श्वभूमीवर संघटनात्मक कारवाई करण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमात आणि निर्णायक प्रक्रियेत नगरसेवकांची अनुपस्थिती ही गंभीर बाब मानली जात आहे. त्यामुळे शहर पातळीवरील नेतृत्व आणि कार्यकारिणीची जबाबदारी ठरवित वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण शहर कार्यकारिणी बरखास्त करण्याचा कठोर निर्णय घेतल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Vanchit Bahujan Aghadi
Chandrapur Mayor Election | कसा उलटला काँग्रेसचा डाव अन् चंद्रपूर महापालिकेत भाजप आघाडीचा झाला महापौर

शहर कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर चंद्रपूर शहरासाठी नवीन कार्यकारिणीची नियुक्ती लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी प्रदेश पातळीवरून थेट हस्तक्षेप होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महापालिकेतील सत्तासमीकरणांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या या निर्णयाकडे महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड म्हणून पाहिले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news