'त्या' पाचही तरूणांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार

कोलारी गाव बुडाले शोकसागरात
Chandrapur Drowning News |
मृत जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे व तेजस ठाकरे. Pudhari File Photo
Published on
Updated on

चंद्रपूर : सुटीचा दिवस असल्याने पर्यटनासाठी आलेल्या पाच तरूणांवर काल शनिवारी (दि.१५) नागभिड तालुक्यातील ब्रिटीशकालीन घोडाझरी तलावात काळाने झडप घातली. पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या सहा पैकी पाच तरूणांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेने अख्खा चंद्रपूर जिल्हा हळहळला. आज रविवारी (दि.१६) दुपारी साडेबाराच्या सुमारास पाचही मृतदेहावर चिमूर तालुक्यातील कोलारी (साठगाव) या त्यांच्या गावी एकाच वेळी वेगवेगळ्या सरणावर पार्थिवाला चित्ताग्नी देण्यात आली. काल शनिवार पासून शोकसागरात बुडालेल्या कोलारी गावात आज आक्रोश, हुंदके आणि शोक पहायला मिळाला. एैन उमेदीच्या वयातच पाच तरूणांना काळाने हिरावून घेतल्याने अंत्यसंस्कारावेळी नागरिकांना आपले अश्रू थांबविता आले नाही. जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे व तेजस संजय ठाकरे यांचेवर अत्यंसंस्कार पार पडले.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील ब्रिटीशकालीन घोडाझरी तलावावर काल शनिवारी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी चिमूर तालुक्यातील कोलारी (साठगाव) येथील जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे , अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे, तेजस संजय ठाकरे व आर्यन हेमराज इंगोले हे सहा तरूण आले होते. दुपारपर्यंत त्यांनी घोडाझरी तलाव परिसरात भ्रमंती करून पर्यटनाचा आनंद लुटला. त्यानंतर उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्यांना पोहण्याचा बेत रोखता आला नाही. सायंकाळी चारच्या सुमारास ते पोहण्यासाठी तलावात उतरले. नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहीरी परिसरात ते पोहण्यासाठी उतरले. या ठिकाणी पाण्यासाठी जेसीबीद्वारे खोल खड्डे करण्यात आले आहेत. त्यामुळे तरूणांना या खोलखड्याचा अंदाज घेता आला नाही. एकाचवेळी ते सहाही जण खड्यात बुडाले. त्यापैकी आर्यन इंगोले तरूण कसाबसा जीव वाचवित बाहेर आला. पाचही तरूण बुडाले. खोल खड्ड्यायमुळे जीव वाचविण्याची संधीच कुणाला मिळाली नाही. पाच पैकी चार तरूण एकट्या गावंडे कुटुंबातील होते. त्यामध्ये दोन सख्खे भाऊ आणि दोन चुलत भाऊ व एका मित्राचा समावेश आहे. स्थानिक मासेमारी करणाऱ्या व्यक्तीकडून नागभीड पोलिसांनी तलावात तासभरात मृतदेह शोधून काढलीत. समाजमाध्यमांवर घटनेची माहिती वादळाप्रमाणे पसरली आणि अख्खा जिल्हा हळहळला.

त्यानंतर या घटनेची माहिती कोलारी (साठगाव) येथे पोहताच एकच आक्रोश झाला. कुटूंबियांनी हबंरडा फोडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीवर त्या कुटूंबियाचा विश्वासच बसत नव्हता. गावात सर्वत्र घटनेची माहिती झाली आणि कोलारी गाव काल पासून शोकसागरात बुडाले. त्यांचे कुटुंबियांनी लगेच घटनास्थळ गाठले. मृतदेह नागभिड येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आली, परंतु रात्र झाल्याने काल शनिवारी शवविच्छेदन होऊ शकले नाही. आज रविवारी करणार असल्याचे वैद्यकिय विभागाने सांगितले. काल शनिवार पासून शोकसागरात बुडालेल्या कोलारी गावात आज अंत्यसंस्कार प्रसंगी दु:खाचा प्रचंड आक्रोश, हुंदके आणि शोकाकूल वातारण बघायला मिळाले. आता त्या कुटुंबियांकडे जगाच्यापडद्याआड झालेल्या उमद्या मुलांच्या आठवणी तेवढ्या उरल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news