बोरचांदली येथे गुराख्यावर वाघाचा हल्ला; गुराखी गंभीर जखमी

मूल तालुक्यात वाघाचे हल्ले वाढले
TIger Attack On Cowherd
बोरचांदली येथे गुराख्यावर वाघाचा हल्लाPudhari Photo
Published on
Updated on

मूल तालुक्यातील बोरचांदली येथे वाघाच्या हल्यात गुराखी गंभीर जखमी झाला. विनोद भाऊजी बोलीवार (वय.36) असे जखमी गुराख्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि.12) दुपारी एक वाजताच्या सुमारास सादागड बीटातील कम्पार्टमेंट नंबर 1800 मध्ये घडली. मूल तालुक्यातील हा परिसर सावली वनपरिक्षेत्रातंर्गत येतो.

TIger Attack On Cowherd
चंद्रपूर : चवताळलेल्या वाघाचा जमावावर हल्ला ; दोघे जण गंभीर जखमी

बोरचांदली येथील विनोद भाऊजी बोलीवार हे उमा नदीच्या परिसरात गावातील जनावरे चराईसाठी घेऊन गेले होते. त्यांच्या सोबतीला गावातील इतर दोन तीन गुराखीदेखील होते. जनावरे परिसरात चराई करीत असताना त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने बोलीवार यांच्यावर झडप घातली. आधीच सावध झालेल्या बोलीवार यांनी वाघाचा हल्ला परतवण्याचा प्रयत्न केला. याबरोबरच सोबत असलेल्या इतर गुराख्यांनी आरडाओरड केल्याने वाघाने नदीपलीकडे धुम ठोकली. त्यामुळे गुराख्याचा जीव वाचला.

चंद्रपूर : अखेर ‘त्या’ पट्टेदार वाघाचा मृत्यू (video)

ही घटना गावात माहिती होताच गावक-यांनी चराई क्षेत्रात धाव घेतली. तसेच सावली वनपरिक्षेत्र कार्यालयास घटनेची माहिती कळविण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या बोलीवार यांना मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास सादागड बीटचे वनरक्षक लंकेश आघाडे हे करीत आहेत. दोन दिवसांपूर्वीच मूल तालुक्यातील केळझर येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याची घटना ताजी आहे. तर सोमवारी पुन्हा बोरचांदली शिवारात घडली. मुल तालुक्यात वाघांचे शेतकरी, शेतमजूरांवर हल्ले वाढले असून नागरिक भयभीत झाले आहेत. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. याआधी वाघाने बोरचांदली मार्गावरील राजगड येथील डोंगरीवर आपले बस्थान मांडले होते. फिस्कुटी ते राजगड असा त्याचा भ्रमंती मार्ग तयार झाला होता. उमा नदीच्या परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याने शेतकऱ्यांमध्ये आणि गुराख्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news