Chandrapur News | चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्यात महिला ठार

Chandrapur Tiger Attack | चंद्रपूर जिल्ह्यात चार दिवसात सहा महिलांचा बळी; मदनापूर बीटातील करबडा येथील घटना
Chandrapur Tiger Attack
नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली(Pudhari Photo)
Published on
Updated on

Chandrapur Tiger Attack

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे हल्ले दरदिवशी वाढत असून आज बुधवारी (१४ मे) सलग चौथ्या दिवशी चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरीक्षेत्रामधील करबडा येथील कक्ष क्र. ८६२ मध्ये तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या एका महिलेला वाघाने ठार केल्याची थरारक घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली. कचराबाई अरुण भरडे (५४) रा . करबडा असे मृतक महिलेचे नाव आहे. चार दिवसातील आजचा सहावा बळी आहे.

चिमूर तालुक्यात सध्या तेंदूपत्ता हंगाम सुरू असून ग्रामीण भागातील कुटुंबीय आपला संसार चालविण्यासाठी तेंदुपत्ता तोडण्यासाठी जात आहे. आज बुधवारी कचराबाई अरुण भरडे ही महिला आपल्या पती सोबत सकाळी आठ वाजताच्या सुमारास गावाशेजारील चौधरी यांच्या शेतीला लागूनच असलेल्या जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेली होती. तेंदुपत्ता तोडत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक महिलेवर हल्ला केला,तेव्हा महिला ओरडली. ओरडण्याच्या आवाजाने घटना पतीच्या लक्षात आली. पतीने बघितले तेव्हा वाघ त्या महिलेला तोंडात पकडून फरफटत नेत असताना दिसून आले. लगेच गावात जाऊन नागरिकांना या घटनेची माहिती दिली. नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा कचराबाईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जंगलात पडून होता.

Chandrapur Tiger Attack
Chandrapur News : ताडोबात आढळले ५६ वाघ, १२ बिबटे,९३ अस्वले

या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी काही वेळ आक्रमक भूमिका घेत जंगलाला कुंपण करा,गावाभोवती तारचे कुंपण करा,मुलाला नोकरी द्या,अशा मागण्या मान्य करा तरच मृतदेह उचला, असा आक्रमक पवित्रा मृतक महिलेचा मुलगा व ग्रामस्थांनी घेतला होता. वनविभाग व पोलीस विभागाने आक्रमक झालेल्या नागरिकांची समजूत काढली. त्या नंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले.

Chandrapur Tiger Attack
Chandrapur News : ताडोबात दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू

यावेळी वनपरीक्षेत्र अधिकारी योगिता आत्राम,वनपाल विनोद किलनाके,अमोल कवासे,जरारे वनरक्षक, मेश्राम, नागलोत, जिवतोडे, गेडाम, खारडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे, दीप्ती मडकाम, पोलीस कर्मचारी वनकर्मचारी वनमजूर आदी उपस्थित होते. वनविभागाच्या वतीने मयत भरडे कुटुंबास पन्नास हजाराची आर्थिक मदत दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news