'अनुसयाबाईं'च्या मृतदेहाला कवटाळून वानर गहिवरले...

अंत्यसंस्काराच्या प्रसंगाची सर्वत्र चर्चा
Chandrapur News |
पिंपळगाव येथील अनुसया धवणे या वृध्देच्या मृतदेहाला कवटाळून गहिवरत असलेले वानर.Pudhari File Photo
Published on
Updated on

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातून एक आश्चर्यकारक अशी घटना समोर आली. आज बुधवारी (दि.२९) वरोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील एका वृध्देच्या मृतदेहाला कवटाळून गहिवरत असलेल्या वानरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वानराच्या या कृतीची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या घटनेकडे कुणी कुतूहल, कुणी चमत्कार तर कुणी योगायोग म्हणून पाहत आहेत.

याबाबत अधिक माहीती अशी की, वरोरा तालुक्यातील पिपंळगाव येथील अनुसया मारोती धवणे यांचे बुधवारी (दि.२९) वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अचानक एका वानराचे आगमण झाले. अंत्यसंस्काराला नागरिकांची गर्दी असल्याने वानर जवळपास भटकत राहीले. त्यानंतर मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला. ते वानर थेट स्मशानभूमीत आले. तिथे त्याने आश्चर्यकारकरित्या मृतदेहाला कवटाळले आणि ते गहिवरू लागले. अनुसयाबाईसोबत काही त्याचे नातेच असावे असा हा प्रसंग होता. हा प्रसंग अनेकांनी कॅमेऱ्यात टिपला. हा प्रसंग आज बुधवारी वरोऱ्यातील पिंपळगावात घडल्यानंतर या प्रसंगाचे व्हिडीओ व्हायरल झाले. या प्रसंगाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news