धोपटाळा येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर दगडफेक; एका मजूराचा मृत्यू

तंटामुक्त अध्यक्षासह पाचजण ताब्यात
Tractor transporting illegal sand
अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर Pudhari File Photo

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : राजुरा शहरालगतच्या धोपटाळा गावाजवळ रात्री रेती चोरी करणाऱ्यांची घटना समोर आली आहे. या प्रकरणात रेती नेणाऱ्या ट्रॅक्टर मालकाने पैसे दिले नाही, म्हणून गावातील लोकांनी रेती घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरवर दगडफेक केली आहे. या घटनेत एका मजूराचा मृत्यू झाला तर दोन मजूर जखमी झाले आहेत. मोहम्मद खान शाहत खान पठाण (वय. 52) असे मृताचे नाव आहे. ट्रॅक्टर मालक देविदास येवले आणि चालक कैलाश कुळसंगे हे जखमी झाले आहेत. राजुरा येथील सोनियानगर येथील रहिवाशी आहेत. पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी धोपटाळा येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रोहित नलिके, श्रविण नलिके, आशिष नुती, राज रायपुरे, स्वप्निल रायकेला या पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. बुधवारी (दि.4) रात्री 11 च्या दरम्यान धोपटाळा नाल्यावर रेती नेण्यासाठी आलेला ट्रॅक्टर क्रमांक (एमएच 34 एबी 7641) मालकाकडे धोपटाळा येथील तंटामुक्ती अध्यक्ष रोहित नलके यांने 30 हजार रूपयांची मागणी केली होता . मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये भांडणं झाली. यानंतर ट्रॅक्टर मालकाने मला पैसे द्यायचे नाही आणि रेतीही न्यायचे नाही, असे सांगून रात्री एक वाजताच्या दरम्यान ट्रॅक्टर नाल्यातून परत नेला.

Tractor transporting illegal sand
बारामतीत फसवणूकीचे मोठे रॅकेट: दुप्पट पैसे देतो, असे सांगून फसविणाऱ्याला अटक; एक साथीदार फरार

यादरम्यान नलके याने आपल्या साथीदारांना बोलावून ट्रॅक्टर चा एक किलोमीटर पाठलाग केला आणि वेकोलिच्या कॉलनीजवळील मंदीराजवळ ट्रॅक्टरवर दगडफेक केली. यावेळी ट्रॅक्टरवर मध्ये बसलेला मजूर मोहम्मद खान दगडफेकीत गंभीर जखमी झाला. त्याला राजुरा रूग्णालयात उपचारासाठी नेले असता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेत अन्य दोन मजूर जखमी झाले. या प्रकरणी पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन व उपविभागीय अधिकारी दिपक साखरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार योगेश्वर पारधी अधिक तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news