Sachin in Tadoba Jungle| ताडोबाच्या नव्या मार्गावर ‘मास्टर ब्लास्टर’ पहिला पाहुणा ; कच्चेपार गेटवर सचिनची जंगल सफारी!

वाघ दर्शन हुकलं, पण निसर्गाने मोहित झाला क्रिकटस्टार, नव्या प्रवेशद्वारावर पहिला खास पाहुणे होण्याचा मान
Sachin Tendulkar
Sachin Tendulkar
Published on
Updated on

चंद्रपूर  : निसर्गप्रेमी आणि क्रिकेटचा ‘मास्टर ब्लास्टर’ यांनी नुकतीच अंतर्गत नव्याने सुरू झालेल्या कच्चेपार (सिंदेवाही) सफारी गेटला भेट देत जंगल सफारीचा आनंद घेतला. या नव्या प्रवेशद्वाराचे पहिले खास पाहुणे होण्याचा मान सचिन तेंडुलकर यांना मिळाला असून, वाघाचे दर्शन झाले नसले तरी त्यांनी सिंदेवाही परिसरातील निसर्ग, जैवविविधता आणि जंगलातील शांततेचा मनसोक्त अनुभव घेतला.

चंद्रपूर जिल्ह्यातील हे देशातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पांपैकी एक मानले जाते. या व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाला चालना देण्यासाठी अलीकडेच सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार येथे नव्या सफारी गेटची सुरुवात करण्यात आली आहे. या नव्या प्रवेशद्वारावरून पहिली सफारी करण्याचा मान भारतरत्न आणि क्रिकेट विश्वातील दिग्गज यांना मिळाला.

शनिवारी सकाळी सचिन तेंडुलकर यांनी कच्चेपार गेटमधून जंगल सफारी करत सिंदेवाही परिसरातील घनदाट जंगल आणि जैवविविधतेचा अनुभव घेतला.  यावेळी त्यांना वाघांचे दर्शन झाले नाही. मात्र या जंगलातील शांतता आणि नैसर्गिक सौंदर्याचा मनापासून आनंद घेतला. सफारीनंतर संवाद साधताना सचिन तेंडुलकर म्हणाले की, “ निसर्गाची सोबत, हिरवागार परिसर आणि जंगलातील शांतता मनाला अत्यंत सुखावणारी होती.” त्यांनी जंगलातील विविध प्रकारची झाडे, पक्षी आणि वन्यजीवांच्या अधिवासाबद्दलही उत्सुकता दाखवत बारकाईने निरीक्षण केले.

या भेटीदरम्यान सिंदेवाही क्षेत्रातील वनाधिकारी अंजली सायंकाल यांनी सचिन तेंडुलकर यांना कच्चेपार या नव्या सफारी मार्गाची रचना, वन्यजीव संरक्षणासाठी राबवण्यात येणारे उपक्रम तसेच सिंदेवाही परिसरातील जंगलाचे पर्यावरणीय महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली. सचिन यांनी वन विभागाच्या कामाचे कौतुक करत काही वेळ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वनअधिकाऱ्यांसोबत छायाचित्रेही काढली.

दरम्यान, कच्चेपार गेट सुरू झाल्यामुळे सिंदेवाही परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यातच क्रिकेट विश्वातील महान खेळाडू यांनी येथे पहिली सफारी केल्याने या नव्या मार्गाची चर्चा राज्यभरात सुरू झाली आहे. वन्यजीव प्रेमी आणि पर्यटकांसाठी सिंदेवाही परिसर आता नवे आकर्षण ठरणार असून, कच्चेपार गेटमुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाचा विस्तार होण्यास मदत होणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news