

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यात अवैधरित्या रेती तस्करीचे प्रमाण वाढले असून याला आळा घालण्यासाठी तहसीलदार राजेश भांडारकर यांनी कठोर पाऊले उचलली आहेत. मागील तीन महिन्यांत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या २७ वाहणांवर कारवाई करून त्यापैकी २१ वाहनमालकांकडून २७ लाख १३ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल केला. तर ६ वाहनमालकांकडून दंड वसूलीची प्रक्रिया सुरू आहे.
रेती तस्करी करणाऱ्या वाहन चालकांकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये मोठे हायवा ट्रक आणि ट्रॅक्टर यांचा समावेश आहे. हे सर्व वाहन धारक रात्रीचा वेळी छुप्या मार्गाने पिपरी, कोंढा नाला, बिजोनी आणि ईतरत्र अशा अनेक रेतीची उपलब्ध नाल्यातून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून रेती तस्करी करीत होते. हा प्रकार सुरू असताना घाट किंवा नाला जवळपास गावातील वाहनांचा मोठ्या आवाजाने नागरिकांची नाहक त्रास होत होता.
अवजड वाहनांनी चांगल्या रस्त्यांची दुरावस्था केली आहे. तहसीलदारांनी केलेल्या कारवाई मुळे रेती माफीयांचे धाबे दणाणले आहेत. तहसीलदार भांडारकर यांनी आपले कर्तव्य अशाच पद्धतीने पार पाडावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.