चंद्रपूरात 54 किलो अंमली पदार्थ पोलिसांकडून नष्ट

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनी चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई
Police officers burning drugs in Chandrapur
अंमली पदार्थ जाळताना पोलीस अधिकारीRepresentive Photo
Published on
Updated on

चंद्रपूर : जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनी चंद्रपूर पोलिसांनी विशेष काम केले आहे. 54 किलो 645 ग्रॅम अंमली पदार्थ नष्ट केली आहे. 26 जुन हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणुन साजरा केला जातो. नशेमध्ये अडकलेल्या व्यक्तींचे शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर कसे दुष्परिणाम होतात. एखादया व्यक्तीचे संपुर्ण आयुष्य कसे बिघडू शकते, अशा नशेत आहारी गेलेल्या लोकांचे जिवन वाचवणे, प्रत्येक व्यक्ती, मुले, मुली यांच्या मध्ये जागरूकता निर्माण करणे हा आजच्या दिवसाचा उद्देश आहे.

चंद्रपूर जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्हयातील जप्त अंमली पदार्थ नाश करण्यात आले. जिल्हा न्यायालय आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या परवानगीने मे. सुपर्ब हॉयजेनिक डिस्पोजल (इंडीया) प्रा. लि., एमआयडीसी चंद्रपूर येथे 54 किलो 645 ग्रॅम अंमली पदार्थ जिल्हा ड्रग्ज डिस्पोजल कमिटी चंद्रपूर यांचे कडुन पंचासमक्ष जाळुन नष्ट करण्यात आला.

Police officers burning drugs in Chandrapur
अमली पदार्थांची तस्करी चिंताजनक

यावेळी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि नागेशकुमार चतरकर, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news