Chandrapur Tiger Captured | दोघांचा बळी घेणारा आठ वर्षीय वाघ अखेर नागभिड तालुक्यात जेरबंद

तळोधी बा.परिसरात घेतला होता दोघांचा बळी , शेतमजुरांनी घेतला सुटकेचा नि:श्वास
Chandrapur Tiger Captured
नागभिड तालुक्यात आठ वर्षीय वाघ जेरबंद करण्यात आलेPudhari Photo
Published on
Updated on

Chandrapur Tiger Captured

चंद्रपूर : दोघांचा जीव घेणाऱ्या एका आठ वर्षीय वाघाला वनविभागाने जेरबंद करण्यास यश मिळविले आहे. आज शुक्रवारी (23 मे) साडेअकराचे सुमारास तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातील गंगासागर बिटात जेरबंद करण्यात आले. हा वाघ (TATR 224) नर जातीचा आठ वर्षाचा आहे. वाघ जेरबंद झाल्याने शेतकरी शेतमजूर व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिण्यात नागभीड तालुक्यातील तळोधी बा. वनपरिक्षेत्रातील गंगासगर हेटी बिटात नियतन क्षेत्र 90 मध्य साठ वर्षीय मारोती सखाराम बोरकर हा तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेला असता त्याचेवर वाघाने हल्ला केला यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर 18 मे रोजी याच परिसरातील वाढोणा निवासी मारोती नकटू शेंडे (वय 64) याचा आलेवाही बिटात कक्ष क्रमाक 697 मध्ये तलावालगतच्या शेतशिवारात तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेला होता. त्याचेवर हल्ला केला. गंभीर जखमी शेंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वारंवार घडणाऱ्या या घटनेमुळे तळोधी बा. परिसरात प्रचंड दहशत पसरली होती. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरली होती. त्यामुळे नागरिकांसाठी धोकादायक ठरलेल्या वाघाला जेरबंद करण्यासाठी मंजूरी मिळाली. आणि त्यानंतर वनविभागाने TATR 224 या वाघाला पकडण्यासाठी वनविभागाचे पथकाने प्रयत्न चालविले होते. त्यांच्या प्रयत्नांना आज शुक्रवारी यश आले आहे.

Chandrapur Tiger Captured
चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यात १५ वर्षीय पट्टेदार वाघ जेरबंद

ब्रम्हपुरी वन विभागाचे वनसंरक्षक राकेश सेपट यांच्या मार्गदर्शनात, सहाय्यक वनसंरक्षक महेश गायकवाड, जीवशास्त्रज्ञ राकेश आहुजा, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे, पोलीस हवालदार (शूटर) अजय मराठे यांच्या मदतीने आज शुक्रवारी (23 मे) ला तळोधी बा. वनपरिक्षेत्रातील गंगासागर हेटी बिटात सावरला रिटामध्ये डॉट मारून बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर त्याला ज्या वाघाला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. तपासणी करून नागपूर येथील गोरेवाडा येथे जेरबंद करण्यात आलेल्या वाघाला पाठविण्यात आले. यावेळी

Chandrapur Tiger Captured
भंडारा: वाघाच्या हल्‍ल्‍यात महिलेचा मृत्‍यू ; संतप्त गावकऱ्यांनी वन विभागाचे वाहन जाळले

तळोधी वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार यांच्या नेतृत्वात वनरक्षक राजेंद्र भरणे, वनरक्षक घनश्याम लोणबोले, वनरक्षक पंडित मेकेवाड, स्वाब फाउंडेशन यश कायरकर, जीवेश सयाम, तसेच जेरबंद करण्यासाठी चंद्रपूर आणि सिंदेवाही भागातील वनरक्षक, पीआरटी सदस्य, वन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. तळोधी बा. पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक किशोर मानकर, रत्नाकर देहारे, सचिन साखरकर व पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थित होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news