आमदार किशोर जोरगेवार यांना मातृशोक

Chandrapur News | अम्मांचे ८० व्या वर्षी निधन
Chandrapur News |
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा जोरगेवार Pudhari Photo
Published on
Updated on

चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा यांनी आज रविवारी  चंद्रपूर येथील राजमाता या त्यांच्या निवासस्थानी सकाळी ९.३० वाजता अखेरचा श्वास घेतला. उद्या सोमवारी सकाळी ९ वाजता गांधी चौक येथील कोतवाली वार्ड येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. बिनवा गेट येथील शांतीधाम येथे त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत.

Chandrapur News |
Chandrapur News : आनंदवनात प्रेमप्रकरणातून तरुणीची हत्या

अम्मांचे सामाजिक कार्यात भरीव योगदान

अम्मांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना विविध संस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे.  त्यांच्या नावाने चंद्रपूरात सुरु असलेल्या "अम्मा का टिफिन" आणि "अम्मा कि दुकान" या उपक्रमांचा अनेकांना लाभ मिळाला. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. १० दिवस नागपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना शनिवारी रुग्णालयातून घरी आणले होते. घरी डॉक्टरांच्या निगराणीत त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्रकृती अचानक  बिघडली आणि सकाळी ९.३० वाजता त्यांचे निधन झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news