'माझी लाडकी बहीण योजना’; पहिल्या टप्प्यात अर्ज करण्याची मुदत १५ जुलैपर्यंत

१ जुलैपासून योजना सुरु
 Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजना : राज्यातील पात्र महिलांना मिळणार मासिक १५०० Pudhari Photo

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. योजनेची सुरूवात १ जुलैपासून करण्यात आली असून पहिल्या टप्प्यातील अर्ज १ ते १५ जुलैपर्यंत भरण्याची मुदत आहे. त्यानंतरही योजना सुरू राहील.

 Ladki Bahin Yojana
लेक लाडकी योजना : पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात जन्मलेल्‍या मुलींना मिळणार ‘हा’ लाभ

योजनेचा उद्देश :

महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक - सामाजिक पुनर्वसन करणे, महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, महिला व मुलींच्या सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करण्याचा योजनेचा उद्देश आहे.

 Ladki Bahin Yojana
लेक लाडकी योजना : १८ वर्षापर्यंत लाखाची शिक्षणासाठी मदत

लाभार्थी पात्रता :

महिला लाभार्थीची वय २१ ते ६० वर्षे असावी, महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी, विवाहित, विधवा, घटस्फोटित परित्यक्त्या, निराधार महिला असावी, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लक्ष पेक्षा कमी असणे गरजेचे.

 Ladki Bahin Yojana
‘Lake Ladki’ scheme : महाराष्ट्रासाठी ‘लेक लाडकी’ : मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्‍य सरकारचे पाऊल

अपात्रता :

कुटुंबातील सदस्य आयकर दाता असल्यास, सरकारी नोकरी, आजी/माजी आमदार/ खासदार, कुटुंबाच्या मालकीची ५ एकर पेक्षा जास्त जमीन असणारे, चार चाकी गाडी असणारे योजनेसाठी अपात्र ठरतात.

 Ladki Bahin Yojana
Maharashtra Budget 2023-2024 Live: मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक-लाडकी’ योजनेची घोषणा, मुलीच्या जन्मानंतर ५००० रुपये मिळणार

अर्ज कसा करावा :

अर्ज नि:शुल्क अंगणवाडी सेविका यांच्याकडे भरता येईल. अर्ज विहित नमुन्यात भरून व त्याला आवश्यक कागद जोडून अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सेतू केंद्र, वार्ड अधिकारी यांना देता येईल. वरील सर्वांकडून अर्ज ऑनलाईन भरून घेता येईल.

 Ladki Bahin Yojana
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष अभियान

आवश्यक कागदपत्रे :

योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधारकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र / महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपर्यंत असावे), बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र असावे.

 Ladki Bahin Yojana
पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीची लेक नाही का? खासदार सुप्रिया सुळे यांचा भाजपला सवाल

जिल्हा स्तरावर सुविधा केंद्र स्थापन

अर्ज भरताना काही समस्या असल्यास जिल्हा स्तरावर सुविधा केंद्र स्थापन केले आहे. त्यासाठी संपर्क क्रमांक 7972059274 तसेच महिला हेल्प लाईन 181 वर संपर्क करता येईल.

अर्जासाठी लागणारे उत्पन्न दाखले तसेच रहिवासी प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी विविध पातळीवर नगरपालिका मुख्याधिकारी, महानगरपालिका अधिकारी, तहसीलदार यांनी कॅम्प आयोजित करून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिल्याचे महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी कळविले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news