Chandrapur Tiger Trishul Captured : तीन बळी घेणारा नरभक्षक 'त्रिशूल' वाघ अखेर जेरबंद! चिमूर तालुक्यात वनविभागाची यशस्वी मोहीम

दहशतीचे सावट दूर! उरकुडपारच्या जंगलात डार्ट मारून पकडले, कापूस वेचणीच्या हंगामात शेतकऱ्यांचा जीव भांड्यात
Chandrapur Tiger Trishul Captured : तीन बळी घेणारा नरभक्षक 'त्रिशूल' वाघ अखेर जेरबंद! चिमूर तालुक्यात वनविभागाची यशस्वी मोहीम
Published on: 
Updated on: 

Chandrapur Tiger Trishul Captured

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील गरडापार परिसरात शेतकरी सदाशिव चिरकुटा खडसंग यांच्यावर हल्ला करून त्यांचा जीव घेणाऱ्या ‘त्रिशूल’ वाघाला अखेर वनविभागाने जेरबंद केले आहे. मंगळवारी (३ नोव्हेंबर) संरक्षित वन कक्ष क्रमांक ३८० मधील उरकुडपार जंगल परिसरात ही कारवाई करण्यात आली. वाघाच्या सततच्या वावरामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

३० ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास गरडापार येथील सदाशिव चिरकुटा खडसंग (वय ५०) यांच्यावर संरक्षित वन कक्ष क्रमांक ३८० मध्ये वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले होते. या वनकक्षाला लागून मोठ्या प्रमाणावर शेती असून, सध्या शेतांमध्ये कापूस वेचणीची कामे सुरू आहेत. या परिसरात वाघाचा वावर कायम राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती.

Chandrapur Tiger Trishul Captured : तीन बळी घेणारा नरभक्षक 'त्रिशूल' वाघ अखेर जेरबंद! चिमूर तालुक्यात वनविभागाची यशस्वी मोहीम
Chandrapur Tiger News : चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये क्षमतेपेक्षा तिप्पट वाघ; तब्बल १० वाघ अन्यत्र हलवणार

यापूर्वी खडसंगी बफर क्षेत्रातही या वाघाच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. तसेच परिसरात पाळीव प्राण्यांवरही हल्ले झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाविषयी नागरिकांचा वाढता रोष पाहता आणि पुढील मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी या वाघाला जेरबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

वनविभागाने मंगळवारी चिमूर प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील गदगाव नियतक्षेत्रांतर्गत उरकुडपार येथील संरक्षित वन कक्ष क्रमांक ३८० मध्ये ही शोधमोहीम राबविली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे आणि पोलीस हवालदार (निशाणेबाज) अजय मराठे यांनी वाघाला डार्ट मारून बेशुद्ध केले आणि जेरबंद करण्यात यश मिळवले. जेरबंद केलेल्या वाघाचे वय अंदाजे पाच वर्षे असून, त्याला पुढील देखरेखीसाठी ब्रह्मपुरी येथील ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC) येथे हलविण्यात आले आहे.

ही कारवाई ब्रह्मपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी एस. आर. आणि सहायक वनसंरक्षक (तेंदू) डॉ. महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मोहिमेत चिमूरचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर भाऊराव देऊरकर यांच्यासह वनपाल, वनरक्षक, क्षेत्रीय वनकर्मचारी, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या रॅपिड रिस्पॉन्स टीमचे सदस्य आणि वन्यजीव शास्त्रज्ञ राकेश अहुजा सहभागी झाले होते.

Chandrapur Tiger Trishul Captured : तीन बळी घेणारा नरभक्षक 'त्रिशूल' वाघ अखेर जेरबंद! चिमूर तालुक्यात वनविभागाची यशस्वी मोहीम
Chandrapur Crime : सातारा गावाच्या माजी सरपंचावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

वाघाला जेरबंद केल्याने गरडापार, उरकुडपार आणि परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मात्र, कापूस वेचणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांनी जंगलालगतच्या शेतांमध्ये काम करताना योग्य ती दक्षता व सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.