चंद्रपुरात बिबट्याची दुचाकीवर झडप; तीन तरुण जखमी

कोठारी ते देवई मार्गावरी घटना
leopard attack
बिबट्याची दुचाकीवर झडपpudhari
Published on
Updated on

चंद्रपूर (पुढारी वृत्तसेवा) : घरगुती रंगकामासाठी दुचाकीने जात असलेल्या तिघांवर बिबट्याने झडप घेतली. यामध्ये दुचाकीवर स्वार असलेले तीन तरुण जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि.२४) कोठारी ते देवई मार्गावर घडली. जखमींमध्ये देवानंद कुमरे, साईनाथ भोयर आणि विजय साखरकर यांचा समावेश आहे. तिघांनाही चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. कोठारी येथील देवानंद कुमरे, साईनाथ भोयर आणि विजय साखरकर हे पेंटिंगची कामे करतात. मागील काही दिवसांपासून कोठारीपासून जवळच असलेल्या देवई या गावात त्यांचे घरगुती रंगकाम करण्याचे काम सुरू होते. या कामासाठी तिघेही सकाळी दुचाकीने जायचे.

leopard attack
Nashik | वडिलांची पाठ फिरताच बिबट्याचा हल्ला, अकरा वर्षीय बालकाचा मृत्यू

मंगळवारी (दि.24) सकाळी गावाहून दुचाकीने देवई गावाला जाण्यासाठी निघाले. एफडीसीएम झरण जंगल कक्ष क्रमांक १०४ परिसरातून ते दुचाकीने जात होते. याचदरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप घेत हल्ला केला. यात दुचाकीवर बसलेले देवानंद कुमरे (वय ४३), साईनाथ भोयर (वय ३३) आणि विजय साखरकर (वय ४१) हे जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांनी आरडाओरड सुरू केली. यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. रस्त्याने ये-जा करणाऱ्यांनी रस्त्यावर पडून असलेल्या तिघांनाही कोठारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथे तिन्ही जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news