चंद्रपूर : भरधाव वाहनाच्या धडकेत पत्नी ठार; पती व मुलगा जखमी

Chandrapur Accident News | चिमूर विहिरगाव मार्गावर अपघात, वाहनात अडकून दुचाकी
Chandrapur Accident News
चंद्रपूर : भरधाव वाहनाच्या धडकेत पत्नी ठार; पती व मुलगा जखमी File Photo
Published on
Updated on

चंद्रपूर : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्‍या चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या दाम्‍पत्‍याला जोरात मार लागला. या अपघात पत्नी जागी ठार झाली असून पती व मुलगा जखमी झाले आहेत. हा अपघात आज रविवारी सायंकाळी 5:30 च्या सुमारास चिमूर विहीरगाव मार्गावर झाला. रिया राकेश जुमडे (वय ३७) रा. पवनी  असे मृतक महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवनी येथील रहिवासी राकेश जुमडे हे पत्नी व मुलासह पिपर्डा येथे वास्तूपूजनासाठी गेले होते. आज रविवारी सायंकाळी ते पवनी येथे (एमएच ३६ - व्ही ५००१) या दुचाकीने परत जात होते. चिमूर विहीरगाव मार्गावर विहीरगावकडून दवाखान्यात जात असलेल्या भरधाव (एमएच ३३ - एफ ५१५१) या चारचाकी वाहनाने ओव्हरटेक करताना दुचाकीला मागून जबर धडक दिली. यामध्ये पत्नी रिया राकेश जुमडे (वय ३७)  हिचा जागेवरच मृत्यू झाला. तर दुचाकी स्वार  पती राकेश ताराचंद जुमडे (वय ३७) व लहान मुलगा अद्वित राकेश जुमडे (४) हे दोघे गंभीर  जखमी आहे.  वाहनाची धडक एवढी भीषण होती की, दुचाकी  चारचाकी वाहनात अडकून फरफटत शेतात जाऊन पडली. पत्नी जागीच ठार झाली. तर  पती राकेश ताराचंद जुमडे, मुलगा अद्वित राकेश जुमडे (४) दोघेही जखमी झाले.

 अपघातग्रस्त चारचाकी वाहन  विहीरगाव येथील मंगेश नन्नावरे यांच्या मालकीची आहे. चालक विनापरवाना   मद्यप्राशन करूनच गावातूनच भरधाव  चालवीत होता अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news