

one killed in Mul road accident
चंद्रपूर : मूल शहरात बुधवारी रात्री उभ्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
मृतकाचे नाव राजू चिलके रा. मूल असे असून ते दुचाकीवरून मूलकडे येत होते. दरम्यान, गडचिरोली मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लाकूड भरलेला ट्रक उभा होता. अचानक दुचाकीचा ताबा सुटून ती थेट ट्रकला जाऊन धडकली. या धडकेत राजू चिलके गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीच मृत्यूमुखी पडले.
घटनेची माहिती मिळताच मूल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी मूल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.