

चंद्रपूर : चंद्रपूर : ताडोबात ऑनलाइन बुकिंगच्या नावाखाली 12 कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) ED पथकाने मुख्य आरोपी रोहित आणि अभिषेक बबलू ठाकूर यांच्या सरकारनगर येथील बंगल्यावर एकाच वेळी छापे टाकले यावेळी ठाकूर बंधू शहराबाहेर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
चंद्रपूर शहरातील स्वाद हॉटेल आणि तीन बेकरीचे मालक अभिषेक ठाकूर आणि रोहित ठाकूर यांच्या हॉटेल, पेट्रोल पंप आणि घरावर ईडीने सकाळी छापे टाकले. नागपुरातून ईडीच्या २५ अधिकाऱ्यांनी मिळून सर वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाइन बुकिंगचा करार अभिषेक ठाकूर आणि रोहित ठाकूर यांच्या चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन कंपनीसोबत होता. यामध्ये 22 कोटी 20 लाख रुपयांपैकी 10 कोटी 65 लाख रुपये 2020 ते 2023 या कालावधीत बुकिंग अंतर्गत जमा करण्यात आले. ज्यामध्ये वनविभागाने 12 कोटी 15 लाख 50 हजार रुपये न भरल्याबद्दल रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याच प्रकरणात अभिषेक ठाकूर आणि रोहित ठाकर यांना अटक करून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.
आज बुधवारी (8 जानेवारी 2025) रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्वाद हॉटेल, बार आणि त्यांच्याशी संबंधित जिल्हा परिषदेसमोरील पेट्रोल पंपावर अधिकारी चौकशीसाठी पोचलेत. एकूण 7 पथके शहरातील विविध ठिकाणी शोध मोहीम राबवत आहेत. ईडीच्या छाप्यामुळे चंद्रपुरात खळबळ उडाली. या छाप्यात मोठे प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ठाकूर बंधूंच्या प्रतिष्ठानांवर ही शोध कारवाई सुरू झाली आहे. स्वाद हॉटेल, बार आणि त्यांच्याशी संबंधित जिल्हा परिषदेसमोरील पेट्रोल पंपावर अधिकारी चौकशीसाठी पोचले आहेत. एकूण 7 पथके शहरातील विविध ठिकाणी शोध मोहीम राबवत आहेत.