चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी मिथेन वायूचे साठे काढण्याची मागणी

चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी मिथेन वायूचे साठे काढण्याची मागणी

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्हा खनिज संपन्न असूनही येथील  शेतकरी, बेरोजगार युवक, सामान्य नागरीक यांना याचा फारसा फायदा झाला नाही.  याउलट प्रदुषन आणि रोगराईने जिल्हा भकास झाला बाहे. येथील खगोल अभ्यासक प्रा.सुरेश चोपणे यांनी शासकीय अहवालांच्या आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्हयात 37 बिलीयन क्युबिक मीटर एवढे विपुल मिथेन वायुचे साठे असल्याचे सांगितले आहे. ही जिल्हयाच्या विकासासाठी एक सुवर्ण संधी असून हे साठे लवकरात लवकर काढून जिल्हयातील शेतकरी-शेतमजूर, सुशिक्षित युवक यांचे करीता विकासाचे दालन उघडून द्यावे अशी मागणी प्रदेश काॅंग्रेसच्या ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष उमाकांत धांडे यांनी केले आहे.

कोल बेडेड मिथेन वायू स्वच्छ उर्जेचे एक मोठे स्त्रोत आहे. या वायूचा उपयोग उर्जा निर्मितीसाठी होतो. वाहनांत पेट्रोल-डिझेल ऐवजी स्वच्छ इंधन म्हणून वापर, घरात स्वयंपाकाचा गॅस म्हणून याचा उपयोग होतो. कृषी क्षेत्रात व उद्योगांत उर्जा निर्मितीसाठी मिथेनचा उपयोग होतो. एवढेच नव्हे तर अवकाशात पाठविण्यात येणा-या राॅकेट मध्ये सुध्दा या वायूचा वापर होतो. विविध फायदे असलेला मिथेन वायू चंद्रपूर जिल्ह्यात आढळणे  जिल्हयाच्या विकासासाठी एक वरदान आहे. चंद्रपूर जिल्हयाचा विकास करावयाचा असल्यास हे साठे त्वरीत काढण्यात यावे अशी मागणी उमाकांत धांडे यांनी शासन, प्रशासनाकडे केलेली आहे.

पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस मंत्रालयाने येथे 2016-17 मध्ये सर्व्हेक्षण केले आणि जिल्हयातील चंद्रपूर, बल्लारपूर, गोंडपिपरी, राजूरा, कोरपना, भद्रावती आणि वरोरा तालुक्यातील भुगर्भात 331 चै किमी भुभागात 37 तर सिरोंचा ब्लाॅक मध्ये 709 चै किमी परीसरात 47 बिलीयन क्युबिक मीटर एवढे मोठे कोल बेडेड मिथेन चे साठे सापडले असल्याची माहिती येथील पर्यावरण आणि भूशास्त्र अभ्यासक प्रा सुरेश चोपणे यांनी दिली होती. त्यांच्या माहिती नुसार शासनातर्फे यापुर्वी 1996-97 मध्ये सुध्दा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयात सर्व्हेक्षण केले गेले होते. परंतू आधुनिक तंत्रज्ञाना अभावी या साठयांचे आकलन करता आले नव्हते. मात्र 2016-17 नंतर शासनाचे लक्ष ख-या अर्थाने या कोल बेडेड मिथेन (CBM) साठयांकडे गेले आणि 2016-17 ते 2022 पर्यंत विमानाच्या सहाय्याने वैज्ञानिक पध्दतीने सिस्मिक सर्व्हे, जिओ सायंटिफिक सर्व्हे,ग्रॅव्हिटी व मॅग्नेटीक सर्व्हे केल्या गेला.चंद्रपूर ब्लाॅक चा समावेश पूर्व विदर्भातील प्राणहिता-गोदावरी बेसिन मध्ये होतो.या श्रेणी 3 मधील बेसीन चे संशोधन केल्यावर येथे व्यावसायिक साठे आढळले आहे.

जिल्ह्यातील हे साठे जमिनी पासून 4 ते 5 कि.मी. खोलवर रेतीचे थरात असून इतरत्र आढळणा-या साठयांपेक्षा कमी खोलवर असल्याने व्यावसायिक श्रेणीत येतात. यात आपल्या जिल्हया सोबतच तेलंगाणाच्या उत्तर आदिलाबाद तालुक्याचाही समावेश आहे. या माहितीचे आधारावरून प्रशासनाने मिथेन वायूचे मौल्यवान साठे लवकरात लवकर काढण्याची प्रक्रीया करावी अशी मागणी उमाकांत धांडे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news