Illegal Gambling Den | चिमुर पोलिसांची मोठी कारवाई : रेनगाबोडी-जामणी जंगलात अवैध जुगार अड्ड्यावर धाड

Seized Cash | १० जुगारी अटकेत, ३ फरार, २७.९० लाखांचा मुद्देमाल जप्त
Illegal Gambling Den
१० जुगारी अटकेत, ३ फरार, २७.९० लाखांचा मुद्देमाल जप्त(Pudhari File Photo)
Published on
Updated on

चंद्रपूर : चिमुर पोलिसांनी मौजा रेनगाबोडी-जामणी जंगल शिवारात उभारण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून दहा जुगारींना अटक केली, तर तिघे आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले. या कारवाईतून पोलिसांनी एकूण २७ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात रोख १ लाख २५ हजार रुपये, ६ चारचाकी, ३ दुचाकी तसेच जुगाराचे साहित्य यांचा समावेश आहे. ही कारवाई काल सोमवारी करण्यात आली.

काल सोमवारी (०६ ऑक्टोबर) चिमुर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली कि, चिमूर तालुक्यातील रेनगाबोडी-जामणी जंगल शिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध जुगार अड्डा सुरु आहे. या माहितीवरून पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात चिमुर पोलिसांच्या पथकाने रेनगाबोडी जामणी जंगल परिसरात सापळा रचून धाड टाकली. या ठिकाणी कापडाच्या तंबूमध्ये काही व्यक्ती ताश पत्त्यांवर हार-जितीच्या पैज लावून जुगार खेळत असल्याचे आढळून आले.

Illegal Gambling Den
Chandrapur News | इरई नदी पूररेषेचे नव्याने सर्वेक्षण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पोलिसांनी तत्काळ कारवाई करून त्या सर्वांना ताब्यात घेतले. पोलिसांनी १० आरोपींना अटक केली. त्यामध्ये सुधीर पोहीनकर (रा. जामणी), रजतकुमार नागवंशी (रा. छिंदवाडा), पांडुरंग रामाजी फलके (रा. समुद्रपूर), अमन भोसले (रा. सेलू), सुरज कोपरकर, फकीरा काकरवार (रा. सेलू), मंगेश गुडघे (रा. कोरा),सुखदेव अवचट (रा. समुद्रपूर), सचिन धोटे (रा. समुद्रपूर), नुमान कुरेशी (रा. भद्रावती आदींचा समावेश आहे. तर गोलु राऊत (रा. समुद्रपूर), जिवन सिडाम (रा. जामणी), अनिल जाधव (रा. शेगांव) हे तिघे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले असून पोलिसांनी त्यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून २७.९० लाखांचा एकूण मुद्देमाल तसेच साहित्य व वाहने जप्त केली आहेत.

त्यामध्ये रोख रक्कम १,२५,०००, ०६ चारचाकी वाहने,०३ दुचाकी वाहने,चार्जिंग बॅटरी, सतरंजी, एलईडी, ताश पत्ते आणि इतर साहित्य असा एकूण सुमारे २७,९०,००० रूपयाचा मुद्देमाला जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक (ठाणेदार) दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत अमोल बारापात्रे, सचिन सायंकार, अतुल ढोबळे, निलेश बोरकर, कुणाल दांडेकर, गणेश वाघ, हर्षल शिरकुरे, उमेश चरफे, रोहित तुमसरे, फाल्गुन परचाके, सौरभ महाजन, अविनाश राठोड आदींचा सहभाग होता.

Illegal Gambling Den
Chandrapur Congress Protest | फसवणूक आणि मतचोरी करणाऱ्यांना धडा शिकवा :  माजी आमदार सुभाष धोटे

या प्रकरणात चिमुर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.स्थानिक स्तरावर ही कारवाई मोठ्या चर्चेचा विषय ठरली असून पोलिसांनीकेलेल्या कारवाईमुळे जुगाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news