Chandrapur weather alert | चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1 व 3 रोजी येलो, 2 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट

Chandrapur weather alert |नागरिकांनी सतर्क राहावे : जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे आवाहन
चंद्रपूर जिल्ह्यासाठी दिनांक 1 व 3 एप्रिल 2026 रोजी येलो अलर्ट तर 2 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी दिनांक 1 व 3 एप्रिल 2026 रोजी येलो अलर्ट तर 2 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Published on
Updated on

Chandrapur weather alert

चंद्रपूर | पुढारी वृत्तसेवा : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यासाठी दिनांक 1 व 3 एप्रिल 2026 रोजी येलो अलर्ट तर 2 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ, सोसाट्याचा वारा (ताशी 40 ते 50 किमी वेगाने) तसेच गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच, काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?

संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्याच्या वेळी घरात सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. खिडक्या व दरवाजांपासून दूर राहावे तसेच सखल भाग, अंडरपास, ड्रेनेज परिसर किंवा पाणी साचणाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे. खराब दृश्यमानतेमुळे पावसात वाहन चालवणे टाळावे आणि विजेच्या तारांपासून तसेच पॉवर लाईन्सपासून दूर राहावे. वादळ व विजांच्या कडकडाटाच्या वेळी मोकळ्या जागेत असल्यास सुरक्षित इमारतीचा आसरा घ्यावा. उंच झाडाखाली, लोखंडी वस्तूजवळ किंवा तात्पुरत्या शेडमध्ये थांबू नये. घरात असताना विद्युत उपकरणे बंद ठेवावीत, लँडलाईन फोनचा वापर टाळावा तसेच पाण्याच्या संपर्कात येणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्‍यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यासाठी दिनांक 1 व 3 एप्रिल 2026 रोजी येलो अलर्ट तर 2 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Nashik Orange Alert | नाशिककरांनो सावधान! पुढचे 4 दिवस जिल्ह्यावर अस्मानी संकट; 'ऑरेंज अलर्ट'सह गारपिटीचा इशारा

जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांनीही खबरदारी घ्यावी : जिल्हाधिकारी

दरम्यान, महाकाली यात्रेदरम्यान जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांनीही हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे. यात्रेसाठी आलेल्या भक्तांनी निवारा क्षेत्राच्या अधिक माहितीकरिता मंदिर परिसरातील नियंत्रण कक्षा भेट देऊन अधिक माहिती घ्यावी.

चंद्रपूर जिल्ह्यासाठी दिनांक 1 व 3 एप्रिल 2026 रोजी येलो अलर्ट तर 2 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Weather: पुणे-नाशिकसह 12 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा, पुढील काही तास महत्त्वाचे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news