Chandrapur Women Protest | दूषित पाणीपुरवठ्याविरोधात महिलांचा वरोरा पंचायत समितीवर मोर्चा

जामगाव (बु.) येथील नागरिकांची स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी मागणी
Warora Polluted Drinking Water Protest
महिलांनी वरोरा पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. Pudhari
Published on
Updated on

Warora Polluted Drinking Water Protest

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील जामगाव (बु.) येथे गेल्या काही महिन्यांपासून दूषित व अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. स्वच्छ पाणीपुरवठा, पाइपलाइन दुरुस्ती व गावातील स्वच्छतेची कामे तातडीने हाती घेण्याची मागणी करण्यात आली.

वरोरा तालुक्यातील जामगाव (बु.) येथे अनेक महिन्यांपासून नागरिकांना दूषित व अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावातील महिलांनी पंचायत समिती कार्यालय गाठून आंदोलन केले.

Warora Polluted Drinking Water Protest
Chandrapur Fraud News | फायनान्स कंपनीच्या नावाने बनावट कर्ज मंजुरीचे आमिष; १५ लाखांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपीला पुण्यातून अटक

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या पाइपलाइनमध्ये गळती होत असून त्यामुळे नाल्याचे व सांडपाण्याचे मिश्रण पिण्याच्या पाण्यात होत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून अनेकांना विविध आरोग्यविषयक तक्रारी जाणवत आहेत. गावात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले असून विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

महिलांच्या शिष्टमंडळाने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर करून तातडीने स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा, खराब झालेल्या पाइपलाइनची दुरुस्ती करावी तसेच गावातील स्वच्छतेची कामे युद्धपातळीवर हाती घ्यावीत आणि प्रशासनाने येत्या १५ दिवसांत या समस्येवर ठोस कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news