Chandrapur Food Poisoning | वरोऱ्यात चिवड्यात पाल; सात जणांना विषबाधा

बसस्टँड रोडवरील मनोज चिवडा सेंटरमधील प्रकार; सातही जण उपजिल्हा रुग्णालयात दाखल
 Warora Lizard In  Chivda
चिवडा खाल्ल्यानंतर सात जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला Pudhari
Published on: 
Updated on: 

Warora Lizard In Chivda

चंद्रपूर : वरोरा शहरातील बसस्टँड रोडवरील एका चिवडा सेंटरमधील चिवडा खाल्ल्यानंतर सात जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार सोमवारी (दि.२८) दुपारी समोर आला. संबंधित चिवड्यात पाल आढळल्याचे सांगण्यात येत असून, बाधित सातही जणांना तातडीने वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, खाद्यपदार्थांच्या स्वच्छता आणि गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

बसस्टँड रोडवर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) लगत असलेल्या मनोज चिवडा सेंटरमध्ये हा प्रकार घडला. येथील चिवडा खाल्ल्यानंतर काही जणांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दूषित चिवड्यामुळे विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सर्व रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

 Warora Lizard In  Chivda
Chandrapur Drought News : चंद्रपूरला दुष्काळाची झळ; जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये 'Trigger-1' लागू, मिळणार 'या' सवलती!

विषबाधा झालेल्यांमध्ये सुवर्णा प्रवीण कोहळे (४५, रा. माजरी), प्रवीण शालीकराम कोहळे (५०, रा. माजरी), पंकज दिगंबर आवारी (४०, रा. राळेगाव), दिगंबर विठ्ठजी आवारी (रा. राळेगाव), अफजल रफीक अहमदखान (रा. भद्रावती/कोगाव), शेख रेहमान (रा. कोरेगाव) आणि आयुब सागीर खान (रा. भद्रावती) यांचा समावेश आहे.

संबंधित दुकान बसस्टँड रोडवरील आयटीआय परिसरालगत असून हा भाग नेहमीच वर्दळीचा असतो. विद्यार्थी, प्रवासी आणि नागरिकांची येथे मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे चिवड्यात पाल आढळल्याच्या प्रकारानंतर नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

 Warora Lizard In  Chivda
Chandrapur News : जिल्‍हाधिकारी, सीईओंनी केले शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन मार्गदर्शन

वृत्त लिहिपर्यंत  या घटनेची अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA)  दखल घेतलेली नव्हती. संबंधित दुकानातील खाद्यपदार्थांची स्वच्छता आणि गुणवत्ता तपासावी तसेच दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news