चंद्रपूर : चिमूरात संविधानाच्या रक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी उतरली रस्त्यावर!

चंद्रपूर : चिमूरात संविधानाच्या रक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी उतरली रस्त्यावर!
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : अनुसूचित जाती,जमाती,इतर मागासवर्गीय समाजाच्या नागरिकांचे अधिकार,राजकिय, सामाजिक आरक्षण,लोकशाही, संपवण्याचा घाट रचून शेटजी भटजींचे राज्य निर्माण करण्याचे प्रयत्न भाजपा सरकार कडून सुरू असून राज्यात बहुजन समाज स्वतःला असुरक्षित समजत असून जातींच्या,धर्माचा नावावर आपापसात लढवल्या जात आहे. बहुजन समाजाचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी चिमूर तालुका वंचित बहुजन आघाडीने रस्त्यावर येऊन ईव्हीएम हटाव,संविधान बचाव या प्रमुख मागणीसाठी आज बुधवारी आक्रोश मोर्चा काढला. मोर्चादरम्यान एव्हीएम हटाव,देश बचाव ही असल्याने, मोर्चेकर्यांनी तहसील कार्यालया पुढे प्रतिकात्मक एव्हीएम ची होळी करून ईव्हीएम हटवण्याची मागणी केली.

चिमूर शहरातील संविधान चौकातून भदंत ज्ञानज्योति महाथेरो यांच्या मार्गदर्शनात,भदंत धम्मचेती एक प्रदेश सदस्य कुशल मेश्राम, डॉ रमेशकुमार गजभे, अरविंद सांदेकर,राजेश बोरकर,जयदीप खोब्रागडे,महिला जिल्हाध्यक्ष कविता गौरकर,बाळासाहेब बन्सोड, युवा जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. यावेळी देशातील सर्वच निवडणूका बॉलेट पेपर वर घेण्यात यावी,तीन पिढ्याची अट रद्द करण्यात यावी,केजी टू पीजी शिक्षण मोफत करण्यात यावी,६२ हजार शाळेचे खाजगीकरण रद्द करावे,सर्व जातीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, कंत्राटी भरतीचा जिआर रद्द करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या. सरकारच्या विरोधात घोषणा देत मोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येत धडकला..

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत करण्यात आले. दरम्यान मोर्चेकर्यांना  भदंत महाथेरो ज्ञानज्योति,उमरेड विधानसभा समनव्यक राजू मेश्राम,बाळासाहेब बन्सोड, कुशलभाऊ मेश्राम, डॉ रमेशकुमार गजभे,शुभम मंडपे, अरविंद सांदेकर,अल्काताई मोटघरे,आदींनी संबोधित केले. मोर्चाची मुख्य मागणी एव्हीएम हटाव,देश बचाव ही असल्याने,मोर्चेकर्यांनि तहसील कार्यालया पुढे प्रतिकात्मक एव्हीएम ची होळी करून ईव्हीएम हटवण्याची मागणी करण्यात आली. शिस्टमंडळाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल रमेश बैस यांना पाठविण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news