

Babupeth Tower Tekdi Python Beaten
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बाबुपेठ भागातील टॉवर टेकडी परिसरात दोन जणांनी वन्यजीव अजगराला पकडून त्याच्या तोंडावर काठीने मारहाण करत जखमी केले. एवढेच नव्हे, तर जखमी अजगराला रस्त्यावर फिरवून त्याच्यासोबत खेळ केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने तातडीने दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत अजगरासह दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रपूर वन्यजीवांप्रती क्रूरतेचा कळस गाठणारी घटना शहरातील बाबुपेठ परिसरात उघडकीस आली आहे. टॉवर टेकडी परिसरात दोन जणांनी एका अजगराला पकडून त्याच्या तोंडावर काठीने वार केले. या मारहाणीत अजगर गंभीर जखमी झाला. त्यानंतर या दोघांनी जखमी अजगराला रस्त्यावर फिरवत त्याच्यासोबत खेळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होताच वन्यजीवप्रेमींमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. व्हिडिओच्या माध्यमातून घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत अजगराचा मृत्यू झाला होता. वनविभागाच्या पथकाने मृत अजगर ताब्यात घेतला तसेच या कृत्यात सहभागी असलेल्या दोन्ही इसमांनाही ताब्यात घेतले.
वन्यजीवांशी क्रूर वर्तन करणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणी वनविभागाने भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत संबंधित कलमान्वये दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.