Chandrapur : ‘त्रिशूल’ वाघासोबत झालेल्या झुंजीत 'पारु' वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू

Tiger News : शेडेगाव जंगलातील घटना
Chandrapur Tiger News |
Chandrapur : ‘त्रिशूल’ वाघासोबत झालेल्या झुंजीत 'पारु' वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू File Photo
Published on
Updated on

चंद्रपूर : ‘त्रिशूल’ वाघासोबत आलेल्या झुंजीत 'पारु' वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू झाला. ही घटना ब्रह्मपुरी वनविभागाच्या चिमूर वनपरिक्षेत्रातील शेडेगाव पर्यटन क्षेत्रामध्ये रविवारी (दि.१५) उघडकीस आली. या बछड्याचे अंदाजे वय ९ महिने असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी घटनास्थळी शवविच्छेदन करून त्याच ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Chandrapur Tiger News |
Chandrapur News : ताडोबात दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू

वनरक्षक ए. एम. मेश्राम हे गस्तीवर असताना त्यांना रविवारी खडसंगी बफर लाईनजवळ एक नर बछडा मृत अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) चिमूर यांना देण्यात आली. माहिती मिळताच त्यांचे अधिनस्त वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. शेडेगाव येथील घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे.) चिमूर तसेच 'एनटीसीए' चे प्रतिनिधी अमोद गौरकर यांनी पाहणी केली. यावेळी मृत नर बछडा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या चेहऱ्यावर, मानेवर व पुढच्या दोन्ही पायांवर खोल जखमा दिसून आल्या. 'पारू' नावाच्या वाघिणीचा हा बछडा असून ‘त्रिशूल’ या वाघाने त्याच्यावर हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोमवारी ब्रह्मपुरीचे उपवनसंरक्षक राकेश सेपट, सहायक उपवनसंरक्षक गायकवाड, वनपरिक्षेत्राधिकारी किशोर देऊळकर, विवेक करंबेकर व मनोज वाटे यांच्या उपस्थितीत पंचनामा करून बछड्यावर अत्यसंस्कार करण्यात आले.

Chandrapur Tiger News |
कोल्हापूर : दोन गव्यांच्या झुंजीत एकाचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news