Chandrapur Deer Death | रेल्वेच्या धडकेत चितळाचा मृत्यू; वन्यजीवांसाठी रेल्वेमार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा

गोंदिया-बल्लारशाह रेल्वेमार्ग जंगल परिसरातून जात असल्याने वन्यजीवांची सुरक्षितता धोक्यात
Talodhi Forest Range Train Hit Deer
रेल्वेच्या धडकेत पाच वर्षीय नर चितळाचा मृत्यू झालाPudhari
Published on: 
Updated on: 

Talodhi Forest Range Train Hit Deer

चंद्रपूर : ब्रह्मपुरी वन विभागांतर्गत तळोधी वनपरिक्षेत्रातील आलेवाही बीट, कक्ष क्रमांक ९४ येथे रेल्वेच्या धडकेत पाच वर्षीय नर चितळाचा मृत्यू झाला. रेल्वे विभागाकडून माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी तेजस बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक अरविंद मने, वनरक्षक तोरले, वन्यजीव अभ्यासक तथा SWAB संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर आणि बचाव पथक प्रमुख जीवेश सयाम यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

मृत चितळाचा मृतदेह सावरगाव वन डेपो येथे नेण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ईशा आकरे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Talodhi Forest Range Train Hit Deer
Chandrapur News : जिल्‍हाधिकारी, सीईओंनी केले शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन मार्गदर्शन

विशेष म्हणजे, आठवडाभरापूर्वी याच परिसरात रेल्वेच्या धडकेत अस्वलाचाही मृत्यू झाला होता. गेल्या वर्षभरात या रेल्वेमार्गावर गौर, चितळ, सांबर यांसह अनेक वन्यजीवांचा रेल्वे अपघातात बळी गेला आहे.

गोंदिया-बल्लारशाह रेल्वेमार्ग जंगल परिसरातून जात असल्याने वन्यजीवांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. वन्यजीवांचे रेल्वे अपघात रोखण्यासाठी जंगलातून जाणाऱ्या रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूंना जाळीदार कुंपण उभारावे आणि आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षित मार्गिका निर्माण कराव्यात, अशी मागणी स्वाब संस्थेने केली आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news