Chandrapur Tigress Captured | अखेर नरभक्षी वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

हळदा-आवळगाव परिसरातील नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास
South Brahmapuri Forest
नरभक्षी T-120 वाघीण अखेर वनविभागाच्या विशेष मोहिमेत जेरबंद Pudahri
Published on
Updated on

South Brahmapuri Forest

चंद्रपूर : दक्षिण ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील हळदा-आवळगाव परिसरात दहशत निर्माण करणारी नरभक्षी T-120 वाघीण अखेर वनविभागाच्या विशेष मोहिमेत जेरबंद करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

९ जुलै रोजी बल्लारपूर येथील अनिल भास्कर दिवटे (वय ३२) यांचा वाघिणीच्या हल्ल्यात  मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आमदार विजय वडेट्टीवार यांनी तातडीने मृतकाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. याचवेळी त्यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत नरभक्षी वाघीण तातडीने जेरबंद करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. नागरिकांच्या जीविताचे संरक्षण हे सर्वोच्च प्राधान्य मानून आवश्यक ती सर्व यंत्रणा तत्काळ कामाला लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या.

South Brahmapuri Forest
Chandrapur news : आदिवासी विद्यार्थ्यांनी तयार केले २ लाख सीडबॉल!

या घटनेनंतर वाघीण शेतशिवार व गावालगतच्या परिसरात वारंवार वावरत असल्याने शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार वडेट्टीवार यांनी वनविभागाकडून सुरू असलेल्या शोधमोहिमेचा सातत्याने आढावा घेत अधिकाऱ्यांशी नियमित संपर्क ठेवत कारवाईला गती देण्याचा आग्रह धरला.

अखेर बुधवारी (दि. २९) उपक्षेत्र आवळगाव, नियतक्षेत्र हळदा येथील कक्ष क्रमांक २२२ मध्ये वनविभागाच्या विशेष पथकाने T-120 वाघिणीला डॉर्ट मारून यशस्वीरीत्या बेशुद्ध केले आणि सुरक्षितपणे जेरबंद केले. यामुळे हळदा, आवळगाव आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

South Brahmapuri Forest
Chandrapur heavy rainfall : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही रेड अलर्ट; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, महामार्ग जलमय

उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी एस. आर. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शुटर अजय सी. मराठे तसेच R.R.T. पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news