चंद्रपूर : दरोड्यासह दुचाकी चोरीप्रकरणी सहा जणांना अटक

Chandrapur crime : राजूरा पोलिसांची कारवाई
Chandrapur crime news
दरोड्यासह दुचाकी चोरीप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली.
Published on
Updated on

चंद्रपूर : १० लाखांच्या केबल चोरीच्या घटनांमध्ये सहा जणांना अटक करण्यात आली. यात चार आरोपींसह दोन विघी संघर्ष बालकांचा समावेश आहे. या संशयितांकडून दरोड्यासह वर्धा, गडचिरोली जिल्ह्यातून मोटरसायकल चोरीच्या घटना उघड करण्यात राजुरा पोलिसांना यश आले आहे. करण इंदुल निषाद, दिपक उर्फ एटीएम अजय राजपुत, लॉरेन्स उर्फ ईशु जार्ज दास, सिराज संग्राम बहुरीया असे संशयित आरोपींचे नाव असून सोबत दोन विधी संघर्ष बालकांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ मार्च २०२५ च्या रात्री सास्ती कॉलरी आर. सी. ऑफीस येथे अज्ञात दरोडेखोरांनी वेकोलीचे एक लाख रुपये किंमतीची केबल चोरुन नेल्याची तक्रार तक्रार सिद्धार्थ हर्षवर्धन तोडे यांनी राजूरा पोलिसांत दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करत सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून वेकोलीतील गुन्ह्यासोबतच गडचिरोली व वर्धा जिल्हयातील मोटारसायकल चोरीचे ३ गुन्हे उघडकीस आणले. या संशयितांकडून चोरलेले एक लाख रुपये किंमतीच्या केबलसह २ लाख ९० हजारांची तीन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. ही कारवाई सहा.पोलीस अधीक्षक तथा ठाणे प्रभारी अधिकारी अनिकेत हिरडे (भा.पो.से.) यांचे नेतृत्वात सपोनि रमेश नन्नावरे, पोउपनि सोरते, पांडुरंग हाके, सफौ किशोर, पोहवा अनुप डांगे, सचिन पडवे, कैलास आलाम, पोअं. महेश बोलगोडवार, योगेश पिदुरकर, शरद राठोड, शफीक शेख, अविनाश बांबोडे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news