चंद्रपूर जिल्ह्यात 37 हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकांची लागवड केली आहे. शेवटच्या टप्यात पिक हाती येत असतानाच मोझॅक किडीचे आक्रमण झाल्याने अख्ख्ये पीक डोळ्यादेखत फस्त झाले. त्यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदतीचे लालीपॉप दिले, परंतु अद्याप जिल्ह्यात ना पंचनामे झाले, ना मदत मिळाली. शेतकऱ्यांचे सायोबीन हे नगदी पिक आहे. दसरा दिवाळीच्या तोंडावर पिक निघून सणसाजरे केले जातात. परंतु यावेळी मात्र अस्मानी संकटाने शेतकरी पुरता हादरला आहे. सोयाबीन पिके फस्त झाल्यानंतर सरकारने तातडीने मदत देणे आवश्यक होती, परंतु अद्याप सोयाबीन उत्पादकांना दमडीची मदत मिळाली नाही. शेतकरी चातकाप्रमाणे मदतीसाठी वाट बघत असताना सरकार फक्त् राजकारण करीत आहे, शेतकऱ्यांप्रती उदासीनता दाखविाण्यात येत असल्याचा आरोप करीत तहसीलच्या समोर सोयाबीन पिकाचे ढिग पेटवून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. तत्काळ नुकसानग्रस्तांकरीता आर्थिक पॅकेज घोषीत करून मदत देण्याची मागणी भारत राष्ट्र समिती जिल्हा समन्वयक भूषण फुसे यांनी सरकारला दिलेल्या निवेदनाद्वारे केली.